टार्गेट 'फिक्स' अन् पुढचं नियोजन व्हॉट्सॲपवर! नाशिकच्या MNC कंपनीतील 'कट्टरतेचा' भयानक पॅटर्न उघड
Nashik Conversion Racket: नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (MNC IT) कंपनीत केवळ लैंगिक शोषणच नाही, तर संघटित धार्मिक कट्टरतेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशिष्ट समुदायातील तरुण-तरुणींनी संगनमताने इतर धर्मीय तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी आणि त्यांचे धर्मांतर करण्यासाठी ‘व्हॉट्सॲप’वर गुप्त गट (WhatsApp Groups) सक्रिय ठेवल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती लागली आहे.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, या कंपनीत काम करणाऱ्या एका विशिष्ट गटाचे दोन प्रकारचे व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार करण्यात आले होते. यामध्ये कोणत्या तरुणीला जाळ्यात कसे ओढायचे किंवा कोणाला ‘टार्गेट’ करायचे, याचे नियोजन केले जात होत. एकदा तरुणी जाळ्यात अडकली की, तिला एका स्वतंत्र ग्रुपमध्ये समाविष्ट करून तिचे ‘ब्रेनवॉश’ करण्याचा आणि तिला कट्टरतेकडे ओढण्याचा प्रयत्न केला जात असे.
संशयित आरोपी अत्यंत पद्धतशीरपणे तरुणींशी जवळीक साधत होते. सुरुवातीला स्वतःला अविवाहित असल्याचे सांगून, तरुणींचे कौतुक करणे आणि त्यांना कामात सवलती किंवा बदलीचे आमिष दाखवून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात होता. ज्या तरुणींनी या प्रकारांना विरोध केला, त्यांना कंपनीत मानसिक त्रास देऊन नोकरी सोडण्यास भाग पाडल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींची कार्यपद्धती (Modus Operandi) अत्यंत नियोजनबद्ध होती. संशयित तरुण स्वतःला ‘सिंगल’ भासवून तरुणींशी जवळीक साधायचे. ऑफिसमधील कामाचा फायदा घेत, हव्या त्या ठिकाणी बदली (Transfer) किंवा रजा मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून त्यांना उपकृत केले जात असे. ज्या तरुणींनी या आमिषांना बळी पडण्यास नकार दिला, त्यांना कामाच्या ठिकाणी जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जाई. या त्रासाला कंटाळून अनेक पीडित तरुणींनी नोकरीचे राजीनामे दिल्याचेही समोर आले आहे.
“बाबा मला वाचवा”, मृत्यूच्या काही तास आधी केला वडिलांना फोन पण
नाशिक पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ९ गुन्हे नोंदवले आहेत. यामध्ये केवळ तरुणच नाही, तर त्यांना मदत करणाऱ्या तरुणींचाही समावेश आहे.यात आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरूख कुरेशी आणि दानिश शेख यांना अटक करण्यात आली आहे. तर या कटात महत्त्वाची भूमिका निभावणारी निदा खान फरार असून तिचा पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणामुळे नाशिकमध्ये संतापाची लाट असून राजकीय वातावरणही तापले आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाने कंपनीच्या बाहेर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. कंपनी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत प्रशासनावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनामुळे कंपनी परिसरात तणाव निर्माण झाला होता, ज्यामुळे दंगा नियंत्रण पथक (RCP) पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी स्वतः कंपनीत जाऊन परिस्थितीची पाहणी केली.






