(फोटो सौजन्य: Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी तिने आपल्या कुटुंबियांना फोन करुन तिला वाचवण्याची विनंती केली होती. ओरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक १२, जुलाहा टोली येथे पहाटे सुमारे दीड वाजता, विवाहित महिला खुशबू खातून यांच्या किंकाळ्या ऐकू आल्याने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. महिलेच्या किंकाळ्या ऐकून स्थानिक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ११२ नंबरवर काॅल करत सदर घटनेची माहिती दिली. स्थानिकांनी असा आरोप केला आहे की, खुशबू खातूनच्या सासरच्या लोकांनी तिच्यावर पेट्रोल टाकून, तिला जाळून तिचा जीव घेतला.
दरम्यान खुशबू खातूनचा रामनगरचे रहिवासी असलेल्या औरंगजेब यांच्याशी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासूनच सासरचे आणि माहेरचे यांच्यात हुंड्यावरुन वाद सुरु होता. कुटुंबाच्या माहितीनुसार, लग्नाला दोन वर्षे होऊनही मूलबाळ झालं नाही म्हणून खुशबूचा सासरच्यांकडून छळ केला जात होता. खुशबुचा भाऊ, सुद्दाम याने सांगितले की, घटनेच्या काही तास आधी रात्री खुशबूने त्यांना फोन करुन सासरचे तिला मारण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगितले. तिने फोनवर वडिलांना तिला वाचवण्याचीही विनवणीही केली. याच्या काही वेळानंतरच तिच्या पेट्रोल ओतून तिला मारण्यात आले. कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप केला असून न्यायाची मागणी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आता घटनेचा तातडीने तपास सुरु केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाचा कसून तपास केला जाणार असून आरोपींवर वेळीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.






