ब्रेनवॉश,धर्मांतर अन् लैंगिक शोषण...!नाशिकमध्ये तरुणींना धर्मांतरासाठी सक्ती; उपवास आणि लिपस्टिकवर बंदीचे धक्कादायक प्रकार समोर
Nashik Crime News: नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासात धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. या कंपनीमध्ये तरुणींचे पद्धतीशपणे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे षडयंत्र या कंपनीत सुरू असल्याचे आढळून आले आहे.
तपासादरम्यान पीडित तरुणीच्या बाबतीत काही अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. संबंधित पिडीत तरूणी गेले दोन वर्ष सलग महिना-महिना उपवास करत होती. तिच्या हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी बोलावल्यास ती त्यांना स्पष्टपणे नकार द्यायची. तिने गेल्या वर्षभरापासून लिपस्टिक लावणेही बंद केले होते. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील संशयित दानिश नावाचा व्यक्ती हा विवाहित आहे, हे तरुणीच्या हिंदू टिम लिडरने अनेकदा सांगितले होते, तिची समजूतही काढली होती. पण दानिशच्या जाळ्यात ती पूर्णपणे अडकल्यामुळे तिने कधीही टिम लिडरवर विश्वास बसत नव्हता.
नाशिकमधील आयटी पार्कमध्ये ‘धर्मांतर रॅकेट’? ८ तरुणींवर अत्याचार आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
ब्रेनवॉश करणारे आरोपीं अत्यंत प्लॅनिंनुसाक काम करत होते. यात फक्त तरुणच नाही तर काही इतर धर्मांच्या तरुणींचाही समावेश होता. या तरुणींशी जवळीक साधून, ‘ तुला विशिष्ट धर्माचा पोषाख छान दिसेल, एकदा ट्राय तर करून बघ,’ असा आग्रह करुन त्यांचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करत होते. तर अनेकदा तसे पोषाख परिधान करण्यासाठी त्यांना जबरदस्ती केली जात होती. असेही तपासातून समोर आले आहे.
या प्रकरणी आतापर्यंत नाशिक पोलिसांनी एकूण ९ गुन्हे दाखल केले आहेत. यात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात १ आणि मुंबई पोलिस नाका पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर, आतापर्यंत ६ संशयितांना अटक करण्यात आली असून ते SIT च्या कोठडीत आहेत. संशयितांना अटक झाल्यानंतर कंपनीची एचआर प्रमुख अश्विनी चैनानी पसार झाल्याची माहिती आहे. पण एसआयटीने तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून तिला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये कंपनी प्रशासनातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही सहभाग होता का, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, या कंपनीतील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका हिंदू तरुणीला आणि संशयित तरुणाला कंपनीच्या टेरेसवर आक्षेपार्ह स्थितीत पकडले होते. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. पण त्यानंतरही कंपनीच्या वरिष्ठांच्या हस्तक्षेपातून प्रकरण दाबून टाकण्यात आले. अनेक तरुणींनी या छळाला कंटाळून अनेक तरुणींनी यापूर्वीच नोकऱ्या सोडल्या आहेत. असेही तपासातून समोर आले आहे.






