काय नेमकं प्रकरण?
अशोक खरात विरोधात एका ३५ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली होती. धमकी देऊन आणि गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने अशोक खरात उर्फ याला पोलिसांनी अटक केली आहे. आज (बुधवार १८ मार्च) खरात याला पहाटे ३ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. यासंदर्भात सध्या अधिक चौकशी सुरु आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ असून, त्याची सत्यता पडताळण्यात येत आहे.
या व्हिडिओमध्ये नामांकित महिला तसेच सेलिब्रिटी वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांची माहिती असल्यास देखील माहिती मिळत आहे. पोलिसांकडून या व्हिडिओची सखोल तपासणी सुरु असून यात अनेक धक्कादायक बाबींचा समावेश आहे. या प्रकरणात भोंदूगिरी करणाऱ्या खरात उर्फ कॅप्टन यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ कोण आहे?
आरोपी अशोक खरात हा स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करत होता. नाशिकमधील सिंन्नर तालुक्यात मोरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे सल्ल्यासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे.
कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षांच्या कारकिर्दीत खरातने १५४ देशांचे दौरे पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याचे मानले जाते.
खरातने आपले लक्ष ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) नावाच्या विज्ञानशाखेच्या अभ्यासाकडे वळवले, तेव्हा त्याच्या आयुष्याला रंजक वळण मिळालं. कॉस्मॉलॉजीने गेल्या १०० वर्षांत प्रचंड प्रगती साधली आहे. आइन्स्टाईन यांच्या १९१७ मधील विश्वाच्या ‘स्थिर प्रतिमाना’द्वारे (static model) सैद्धांतिक भौतिकशास्त्राची एक शाखा म्हणून याची सुरुवात झाली; आणि सुरुवातीच्या काळात, विशेषतः लेमैत्र (Lemaître) यांच्या कार्यामुळे या शाखेचा विकास झाला.
Pune Crime: शाळेतून घरी आला, खेळायला गेला आणि…, थेट आढळला मृतदेह; हत्या की अपघात?
Ans: अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’, जो स्वतःला अंकशास्त्रज्ञ व मांत्रिक म्हणून ओळख करून देत होता.
Ans: एका महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे.
Ans: पोलिसांनी त्याच्याकडून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून त्यांची तपासणी सुरू आहे.






