नाशिकच्या नांदगाव तालुक्यात दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या वादातून मुलानेच जन्मदात्या वडिलांचा लोखंडी पाईपने झोपेत निर्घृण खून केला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतून लहान मुल पळवणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे आणि खूप गंभीर बाब आहे. अशी एक पत्र राज ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होत. नवी मुंबई परिसरात लहान मुल…
Cyber Fraud News: सायबर चोरट्यांनी अवघ्या काही मिनीटांत या दोघांच्या बँक खात्यावरून तब्बल सव्वादोन लाख रूपये काढून घेतले. मोबाईलवर पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून बँक खात्याची माहिती मिळवीत चोरट्यांनी संधी साधली.
मुंबईनंतर नाशिकमध्येही मुलं पळवण्याच्या संशयास्पद घटनांनी खळबळ उडाली आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या भागांतून मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून, अपहरणाचा संशय घेऊन पोलीस शोधमोहीम राबवत आहेत.
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 17 वर्ष 10 महिन्यांच्या निराधार अल्पवयीन मुलीने ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये अकाली बाळाला जन्म दिला. जिल्हा रुग्णालयात एमएलसीदरम्यान प्रकार उघड झाला.
नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ धक्क्यावरून झालेल्या वादातून 21 वर्षीय स्पर्श कामे याच्यावर धारदार शस्त्राने पोटात वार करण्यात आला. तो गंभीर जखमी असून पंचवटी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल.
त्र्यंबकेश्वरातील 45 वर्षीय महिलेने तब्बल 14 मुलांना जन्म दिला असून आर्थिक संकटामुळे सहा मुलं विकल्याचा गंभीर संशय व्यक्त झाला आहे. 100 रुपयांच्या स्टॅम्पवर मुलीला दत्तक दिल्याचंही उघड झाल्याने प्रशासनाने चौकशी…
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात 45 वर्षीय महिलेनं गरिबीमुळे 14 मुलांपैकी काही मुलांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आशा कर्मचाऱ्यांच्या तपासादरम्यान हे उघड झाले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
नाशिकच्या सटाण्यात 9 वर्षीय मुलीवर 75 वर्षीय वृद्धाकडून सहा महिन्यांपासून पैसे-चॉकलेटचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार. घटना उघडकीस येताच संताप; आरोपी अटक, पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद, कठोर शिक्षेची मागणी.
सप्तश्रृंगी गडावरुन परतताना भाविकांची इनोव्हा कार संरक्षण कथडा तोडत 600 फूट दरीत कोसळली. भीषण अपघातात पिंपळगाव बसवंत येथील पटेल कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. रात्री बचावकार्य अडचणींमुळे मंदावले. परिसरात हळहळ.
Maharashtra University fraud: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या शुल्काच्या बनावट पावत्या तयार करून ₹१.५३ कोटींचा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या सामनगावात 10 वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, तर पेठरोडमध्ये 43 वर्षीय व्यक्तीनेही गळफास लावून जीव दिला. दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, कारण…
नाशिक पोलिसांनी दोन महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात लोंढे टोळी सदस्य भूषण लोंढे याला यूपी-नेपाळ सीमेवर अटक केली. पळून जाण्यासाठी 34 फुटावरून उडी मारत तो जखमी झाला. खून, खंडणीसह अनेक गुन्ह्यांमध्ये…
नाशिकमध्ये तरुणीने पती आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध कुरिअरने ‘ट्रिपल तलाक’ पाठवल्याची तक्रार दाखल केली. साडेतीन वर्षे पैशांसाठी छळ, मारहाण व सोन्याचे दागिने बळजबरीने घेतल्याचा आरोप. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकच्या इंदिरानगरमध्ये मानलेल्या मामाकडून दोन अल्पवयीन भाचींवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितांच्या आईच्या तक्रारीनुसार आरोपी अटकेत असून पोक्सो, बलात्कार आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल.
नाशिकच्या देवळा तालुक्यात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळले. पतीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज, तर पत्नी व दोन्ही मुलं झोपेत मृतावस्थेत. पोलिस तपास सुरू असून कारण अस्पष्ट आहे.
सिन्नरमध्ये मोठी फसवणूक! माजी संचालकांनी राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्या धनादेशाचा गैरवापर करत आणि खोट्या सह्या करून ₹४० लाखांचे कर्ज काढले. ५ जणांवर गुन्हा दाखल.
नाशिकच्या मालेगावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली. २४ वर्षीय आरोपी विजय खैरनरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिसरात भीती आणि रोषाचे वातावरण आहे.
नाशिकमध्ये भोंदूबाबा गणेश जगताप याने जमिनीतून सोने काढण्याचे, पूजाविधी करण्याचे आणि कुटुंबावर संकट येईल अशा धमक्या देत महिलेला लैंगिक शोषणासह तब्बल 50 लाखांची फसवणूक केली. भोंदूबाबा फरार आहे.