Nuh violence, Nuh Violence news, Nuh violence flame reaches Rajasthan, high alert in Bharatpur, internet shut service stopped in bharatpur, Rajasthan news,भरतपूरमध्ये हाय अलर्ट, नूह हिंसाचार, नूह हिंसाचाराची झळ राजस्थानपर्यंत पोहोचली, भरतपूर जिल्ह्यात इंटरनेट बंद, राजस्थान बातम्या
हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील हिंसाचारामुळे (Haryana Violnece) फरिदाबाद आणि गुरुग्राममध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आता या हिंसाचाराची झळ राजस्थान पर्यंत पोहोचली आहे. भरतपूर जिल्ह्यात तणावपूर्ण परिस्थिती बघण्यात येत आहे. राजस्थान सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून भरतपूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केली आहे. संपूर्ण भरतपूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरियाणा-भरतपूर सीमेवर कडक नाकाबंदी करण्यात आली असून प्रत्येक कोपऱ्यावर पोलीस तैनात आहेत.
[read_also content=”ट्विटरच्या मुख्यालयातून काढला X लोगो, ‘या’ कारणामुळे कारवाई, मस्क यांना भरावा लागेल दुप्पट दंड! https://www.navarashtra.com/india/twitter-new-logo-x-removed-from-head-quarter-in-san-francisco-nrps-439395.html”]
भरतपूरचे पोलिस अधीक्षक मृदुल कछावा यांनी सांगितले की, जिल्ह्यात पाळत वाढवण्यात आली असून सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यात येत आहे .ते म्हणाले की, हरियाणाच्या सीमेला लागून असलेल्या भागात सतर्कता बाळगली जात आहे.
सोमवारी हरियाणातील नूह जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती दुर्गा वाहिनी आणि बजरंग दलाच्या ब्रजमंडल 84 कोस शोभा यात्रा रोखण्यासाठी एका समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली होती. त्यानंतर झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये दोन होमगार्डसह एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे डझनभर पोलिस जखमी झाले आहेत. अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, होमगार्ड जवान नीरजचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. हिंसाचारात शहीद झालेल्या दुसऱ्या होमगार्ड जवानाचे नाव गुरसेवक असे आहे.
मुस्लिमबहुल नुह येथे लागलेली जातीय हिंसाचाराची आग नंतर सोहना, गुरुग्राम आणि फरीदाबादपर्यंत पसरली. हिंसाचाराच्या घटनांनंतर जिल्ह्यात कलम 144 लागू करून सर्व प्रभावित जिल्ह्यात लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.शाळा, महाविद्यालयेही बंद असून जिल्ह्याच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हरियाणा सरकारने नूह जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्सच्या 20 कंपन्या तैनात केल्या आहेत. पोलीस आणि निमलष्करी दले सर्वत्र सतत गस्त घालत असतात.