हरियाणातील नूहला हिंसाचाराला खतपाणी घालणाऱ्यांवर पोलीस आता कारवाई करत आहेत. नूह हिंसाचारातील १९ आरोपी गुरुवारी न्यायालयात हजर झाले. येथे न्यायालयाने या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नूह येथील धार्मिक यात्रेदरम्यान झालेला हल्ला आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचारात सोशल मीडिया आणि सायबर गुन्हेगारांचे कनेक्शन समोर येत आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर हरियाणा सरकारने या कोनातून चौकशी सुरू केली आहे.
नूह हिंसाचारामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये तणाव आणि जातीय संघर्ष निर्माण झाला आहे. एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू पिता-पुत्र आणि महिला पोलिसाचे प्राण वाचवून हिंदू-मुस्लिम त्यांना नवं आयुष्य दिलं आहे.
हरियाणाच्या नूह जिल्ह्यात सोमवारी विश्व हिंदू परिषदेची (VHP) बृजमंडल जलाभिषेक यात्रा थांबवल्यामुळे उसळलेल्या हिंसाचाराच्या आगीमुळे गुरुग्रामच्या सोहना आणि फरिदाबादसह अनेक भागात परिस्थिती आणखीनच बिकट झाली.
हरियाणातील नूह येथे काढण्यात आलेल्या भगव्या मिरवणुकीत दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. यावेळी दगडफेकीच्या घटना घडल्या असून ३० हून अधिक वाहने जाळण्यात आली आहेत. तणावपूर्ण परिस्थिती पाहता कलम 144 लागू करण्यात…