BJP Leader Murder: ओडिशातील गंजम जिल्ह्यातील ब्रह्मपूर येथील वकील पिताबास पांडा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पांडा यंच्या घरासमोरच सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. शहरातील ब्रह्मनगर भागात त्यांच्या घरासमोर ही घटना घडली आणि संपूर्ण परिसरात खळबळ आणि तणाव निर्माण झाला.
GST कपातीनंतर देशातील सर्वात 5 स्वस्त कार्स, किंमत केवळ 3.49 लाखांपासून सुरू; तपशील जाणून घ्या
पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पिताबास पांडा यांच्या ब्रह्मनगर येथील घराजवळ प्रवेश केला. पांडा घराबाहेर पडताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि ते लगेचच घटनास्थळावरून फरार झाले. पण पांडा यांच्या छातीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तातडीने एमकेजीसी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि तपास सुरू केला आहे, आरोपी हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी जवळच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत.
पिताबास पांडा हे ओडिशाचे एक प्रख्यात वकील आणि राज्य बार कौन्सिलचे सदस्य होते. ते एक मजबूत कायदेशीर पार्श्वभूमी असलेले आणि सक्रिय सामाजिक आणि राजकीय भूमिका असलेले वरिष्ठ वकील होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपमध्ये सामील झाले. ब्रह्मपूर शहर आणि गंजम जिल्ह्यात मागील सरकारच्या काळात झालेल्या असंख्य भ्रष्टाचार आणि अनियमिततेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता. त्यांच्या क्रूर हत्येमुळे कायदेशीर आणि राजकीय वर्तुळात तीव्र दुःख पसरले आहे. वकील समुदाय संतापला आहे आणि भाजप कार्यकर्ते दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी करत आहेत.
Women’s World Cup 2025 : Tazmin Brits ची एक खेळी आणि स्मृती मानधनाचा मोडला रेकाॅर्ड! शतकाने मोडले
ऑल ओडिशा लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता ज्ञान रंजन मोहंती यांनी अधिवक्त्याच्या हत्येचा तीव्र निषेध नोंदवला आहे. “ही केवळ एका व्यक्तीची हत्या नसून, न्यायव्यवस्थेवर आणि कायद्याच्या राज्यावर थेट हल्ला आहे,” असे ते म्हणाले. मोहंती यांनी मुख्यमंत्री, गृह सचिव, ओडिशा डीजीपी, दक्षिणी रेंजचे डीआयजी आणि गंजम जिल्ह्याचे एसपी यांना त्वरित कारवाई करून सर्व गुन्हेगारांना अटक करण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, जनतेमध्ये तीव्र संताप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, ब्रह्मपूर एसपी सर्वन विवेक आणि वैद्यनाथपूर आयआयसी सुचित्रा परिदा रजेवर असताना ही गोळीबाराची घटना घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अधिकृत आकडेवारी परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर स्थिती अधोरेखित करते.