औरंगाबाद : औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यात एक संताप आणणारी घटना समोर आली आहे. मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. एव्हढ्यावरच न थांबता आरोपींनी महिलेला मारहाण करताना व्हिडिओ देखील बनवला आणि हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल सुद्धा केला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[read_also content=”दोन बायका फजिती ऐका! दाेन बहिणींसोबत लग्न करणारा नवरदेव अडचणीत, महिला आयोगाचे कारवाईचे आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/state-women-commission-oredr-to-take-action-against-a-man-who-married-two-girls-nrps-350926.html”]
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यात एक वृद्ध महिला तिच्या नातवासोबत राहते. गावातीलच विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन, तुमच्या नातूने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप करत तिला मारहाण केली. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता तिला मारहाण करतानाचा व्हिडिओ रेकॅार्डिंग केलं आणि ते सोशल मिडियावर शेअर देखील केलं. या प्रकरणी रात्री गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
[read_also content=”मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर अडीच कोटींच सोनं जप्त https://www.navarashtra.com/crime/2-5-crore-gold-seized-at-chhatrapati-shivaji-maharaj-airport-in-mumbai-nrps-350933.html”]
वृद्ध महिलेला परिसरातील पारधी वस्तीवर आणल्यावर आरोपींनी तिला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी संतापजनक म्हणजे महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला विवस्त्र करत मारहाण केली. यावेळी पीडित विनवणी करत होती. दयेची भीक मागत होती. मात्र आरोपींना तिच्यावर दया आली नाही. त्यांनी मारहाण करणे थांबवले नाही.