Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनैतिक संबधातून पत्नीने पोलीस पतीला संपवलं; पण एक व्यवहार अन् भांडं फूटलं? असं उलगडलं हत्येचं गूढ

पनवेल जीआरपीमध्ये कार्यरत असणारे पोलीस हवालदार विजय चव्हाण (४२) यांची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह घनसोली आणि रबाळे रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर आढळून आला होता.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 07, 2025 | 10:23 PM
अनैतिक संबधातून पत्नीने पोलीस पतीला संपवलं; पण एक व्यवहार अन् भांडं फूटलं? असं उलगडलं हत्येचं गूढ

अनैतिक संबधातून पत्नीने पोलीस पतीला संपवलं; पण एक व्यवहार अन् भांडं फूटलं? असं उलगडलं हत्येचं गूढ

Follow Us
Close
Follow Us:

पनवेल जीआरपीमध्ये कार्यरत असणारे पोलीस हवालदार विजय चव्हाण (४२) यांची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह घनसोली आणि रबाळे रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी विजय चव्हाण यांची पत्नी, तिचा प्रियकर आणि आणखी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण (३५) आणि तिचा प्रियकर निंबा ब्राह्मणे (२९) यांनी कट रचून विजय चव्हाण यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी आता ब्राह्मणे, पूजा चव्हाण, प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण (२३) आणि प्रवीण आबा पानपाटील (२१) यांना अटक केली आहे.

High Court: एकदा मुलीचा पाठलाग करणे म्हणजे गुन्हा नाही, पण…, उच्च न्यायालयानं काय दिला निर्णय?

विजय चव्हाण यांची हत्या झाल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला. तसेच रेल्वे पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांच्या निरीक्षणाखाली तपास सुरू केला. तपासासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या. पाच दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी खरे मारेकरी शोधले. प्रियकर ब्राह्मणेने रचलेल्या कटानुसार, पानपाटीलने चव्हाण यांना नवीन वर्षाच्या पार्टीसाठी ३१ डिसेंबर रोजी बोलावून घेतले. चव्हाण आल्यानंतर त्या दोघांनी धीरजच्या इको वाहनात एकत्र बसून पार्टी केली. विजय चव्हाण मद्याच्या अमलाखाली गेल्यानंतर ब्राह्मणेने तिथे येऊन रात्री ११.३० च्या सुमारास गळा दाबून त्यांची हत्या केली.

यानंतर तिघांनी चव्हाण यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅक नजीक नेऊन टाकला. या घटनेनंतर धीरज मात्र भेदरला होता. त्यामुळे ब्राह्मणेने त्याला इको वाहन घरी नेण्यास सांगितले. धीरज आपली गाडी घेऊन घरी गेला. यादरम्यान ब्राह्मणे आणि पानपाटील रेल्वे ट्रॅकशेजारीच तब्बल चार तास थांबले. सकाळी जेव्हा पहिली ट्रेन यायला लागली, तेव्हा त्यांनी चव्हाणचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर ठेवला. लोकल अत्यंत जवळ आल्यानंतर मारेकर्‍यांनी केलेले हे कृत्य मोटरमनच्या निदर्शनास आले. मोटरमनने या घटनेची माहिती आरपीएफ जवान आणि वाशी रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

Pune Crime News: ज्येष्ठ महिलेची फसवणूक; केअरटेकर महिलेला बेड्या, साडेआठ लाखांचे दागिने जप्त

तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी चव्हाण यांचा मोबाइल कसून तपासला. तेव्हा मोबाइलमधील जीपेवरून शेवटचा व्यवहार घनसोली येथे एका अंडा स्टॉलवर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना हा पहिला पुरावा मिळाला. या स्टॉलच्या नजीक असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर पोलिसांना विजय चव्हाण आणि त्यांच्याबरोबर असलेला धीरज आढळून आला. तसेच चव्हाण यांनी शेवटचा व्हिडीओ कॉल आपल्या मित्राला केला होता, त्यातही धीरज त्यांच्या बरोबर असल्याचे आढळून आले.

याबरोबरच धीरज आणि चव्हाण यांची पत्नी पूजा यांच्यात फोनवरून वारंवार संभाषण झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. यानंतर धीरज राहत असलेल्या द्रोणागिरी येथील इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धीरज रात्री १.३० च्या सुमारास इको वाहन घेऊन आल्याचे दिसले. या सर्व पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी धीरजला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ब्राह्मणे, पूजा आणि पानपाटील यांचा कट उघड केला.

पोलिसांनी पत्नी पूजा चव्हाणची चौकशी करून हत्येमागचा उद्देशही जाणून घेतला. पत्नीने सांगितले की, चव्हाण यांच्या व्यसनाधीनतेला ती कंटाळली होती. तसेच ते वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडेही जात होते. तसेच जवळीक साधत असताना ते कधी कधी हिंसक होऊन मारहाण करत असाही दावा पत्नीने केला. ही बाब प्रियकर ब्राह्मणेला सांगितल्यानंतर त्यांनी विजय चव्हाण यांना संपविण्याचा घाट घातला.

Web Title: Panvel grp constable case solve last google pay transaction police crack his murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 10:21 PM

Topics:  

  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime News: घरात एकटं असतांना पोलीस हवालदाराने संपवले आयुष्य, एकटेपणा आणि आजारापासून त्रस्त
1

Mumbai Crime News: घरात एकटं असतांना पोलीस हवालदाराने संपवले आयुष्य, एकटेपणा आणि आजारापासून त्रस्त

Mumbai Crime: डिलिव्हरी बॉयने सतत बेल वाजवल्याच्या रागातून माथेफिरूकडून हवेत गोळीबार; मुंबईमधील घटना
2

Mumbai Crime: डिलिव्हरी बॉयने सतत बेल वाजवल्याच्या रागातून माथेफिरूकडून हवेत गोळीबार; मुंबईमधील घटना

Mumbai Crime : जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली गरोदर महिला आरोपी पसार; पोलिसांचा शोध सुरु
3

Mumbai Crime : जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली गरोदर महिला आरोपी पसार; पोलिसांचा शोध सुरु

Mumbai Crime : मुंबईत ८१ वर्षीय महिला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात; ८.७० कोटी गमावले, नेमकं काय घडलं?
4

Mumbai Crime : मुंबईत ८१ वर्षीय महिला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात; ८.७० कोटी गमावले, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.