Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: इचलकरंजीत बँक अधिकाऱ्यांसाह वकिलावर गुन्हा दाखल; नेमका विषय तरी काय?

नमुद मिळकतीचे टीपी स्कीम 1 अंतर्गत उपसंचालक भूमीअभिलेख पुणे यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या तक्रारीवर उपसंचालकांनी अंतरिम स्थगिती दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 13, 2024 | 05:43 PM
Crime News: इचलकरंजीत बँक अधिकाऱ्यांसाह वकिलावर गुन्हा दाखल; नेमका विषय तरी काय?

Crime News: इचलकरंजीत बँक अधिकाऱ्यांसाह वकिलावर गुन्हा दाखल; नेमका विषय तरी काय?

Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी:  बनावट दस्त आणि कागदपत्रे तयार करुन तामिळनाडू बँकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने १२ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज काढून मिळकतीवर बोजा नोंद करून फसवणूक केल्याप्रकरणी नामांकीत वकीलासह यंत्रमाग उद्योजक व बँकेतील अधिकाऱ्यांसह ९ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

दरम्यान, जिल्हा न्यायाधिश, बँकेच्या पॅनेलवरील वकील, महिला पोलीसासह  इचलकरंजीतील नामांकित वकीलावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत यंत्रमाग उद्योजक मारुती दत्तोबा निमणकर, प्रकाश मारुती निमणकर, राजेश मारुती निमणकर, ऋषिकेश राजेश निमणकर, अभिषेक राजेश निमणकर (सर्व रा.राजाराम रोड), ॲड.एस.एन.मुदगल (रा.बावणे गल्ली), दत्तात्रय पी.म्हातुगडे (रा.कागवाडे मळा), तामिळनाडू बँकेचे तत्कालिन मॅनेजर जी.गणेशकुमार (रा.शिवकाशी ब्रँच विरुदानगर), विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमनिक्कम (सध्या रा.निसर्ग रेसिडन्सी जुना चंदूर रोड, मुळ रा.मदुराई) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील फिर्याद ॲड.दिगंबर शंकरराव निमणकर (वय ७५, रा.राजाराम रोड) यांनी दिली आहे.

फिर्यादी ॲड.दिगंबर निमणकर यांच्या मालकीची राजाराम रोड येथे मिळकत आहे. संशयित आरोपी मारुती निमणकर हे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत. नमुद मिळकतीचे टीपी स्कीम 1 अंतर्गत उपसंचालक भूमीअभिलेख पुणे यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या तक्रारीवर उपसंचालकांनी अंतरिम स्थगिती दिली आहे, असे असताना २०२२ ते २०२४ या कालावधीत संशयित मारुती निमणकर (मंगल टेक्स्टाईल) व प्रकाश विव्हींग मिलचे प्रोप्रा. प्रकाश निमणकर, मे.मारुती टेक्स्टाईल व राजेश टेक्स्टाईलचे प्रोप्रा. राजेश निमणकर, ऋषिकेश टेक्स्टाईलचे प्रोप्रा. ऋषिकेश निमणकर, अभिषेक टेक्स्टाईलचे प्रोप्रा. अभिषेक निमणकर यांनी नामांकीत वकील एस.एन.मुदगल व बँकेचे तत्कालिन मॅनेजर जी.गणेशकुमार व विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमनिक्कम यांना हाताशी धरुन बनावट कागदपत्रे तयार करुन चुकीच्या कार्यपद्धतीने संगनमताने १२ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज बनावट दस्त आणि कागदपत्राद्वारे करुन घेतले.

त्या मिळकतीवर बोजा नोंद केला , ही बाब लक्षात आल्यानंतर ॲड.दिगंबर निमणकर यांनी पोलीसात धाव घेऊन या प्रकरणी नामांकीत वकीलासह ९ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे  यंत्रमाग उद्योजक मारुती निमणकर हे शतक महोत्सवी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनेचे तत्कालिन चेअरमन आहेत. फिर्यादी ॲड.दिगंबर निमणकर यांच्या मालकीची राजाराम रोड येथे मिळकत आहे. संशयित आरोपी मारुती निमणकर हे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत. नमुद मिळकतीचे टीपी स्कीम 1 अंतर्गत उपसंचालक भूमीअभिलेख पुणे यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या तक्रारीवर उपसंचालकांनी अंतरिम स्थगिती दिली आहे.

न्यायव्यवस्थाच आरोपीच्या पिंजऱ्यात !
सातारा येथील जिल्हा न्यायाधिश, कोल्हापूरातील महिला पोलीस शिपाई , कोल्हापूरातील बँकेच्या पॅनेलवरील वकीलासह इचलकरंजीतील नामांकित वकीलावर गुन्हा दाखल झाल्यामुळे न्याय मिळवून देणारी यंत्रणाच आता आरोपीच्या पिंजऱ्यात अडकल्याने सर्व सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचे ? असा प्रश्न पडला आहे.

Web Title: Police case file against 9 people about fake documents create tamilnadu bank crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 05:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.