सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा माने असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, ती सातारा जिल्ह्यातीलच खटाव तालुक्यातील मानेवाडी येथील मूळ रहिवासी होती. शिक्षणासाठी घरपासून दूर राहून ती सातारा येथे आपले भविष्य घडवत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले.
काही दिवसांपूर्वी पूजा आणि तिचा एक खास मित्र कोल्हापूरच्या प्रसिद्ध श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परत येत असताना त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला तीव्र स्वरूपाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पूजाच्या डोळ्यांसमोरच तिच्या खास मित्राचा जागीच मृत्यू झाला. या थरारक आणि भयानक अनुभवाने पूजाच्या कोमल मनावर गंभीर परिणाम केला होता.
हेही वाचा: Pregnant Woman Abuse: “पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!” सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
ज्या मित्रासोबत कायम हसण्या-खेळण्यात दिवस जायचे, त्याला अचानक डोळ्यांसमोर तडफडताना आणि जगातून निघून जाताना पाहिल्याचे दुःख पूजाला सहन झाले नाही. अपघाताची ती भयानक दृश्ये सतत तिच्या डोळ्यांसमोर येत होती.
मित्राच्या अकाली आणि अचानक झालेल्या जाण्यामुळे ती तीव्र नैराश्यात (Depression) गेली. कुणाशीही फारसे न बोलणे आणि सतत त्याच विचारात राहणे, यामुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली होती. या प्रचंड मानसिक वेदनेतूनच तिने सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
एका होतकरू तरुणीने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे मानेवाडी गावावर आणि साताऱ्यातील विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, या दुर्दैवी घटनेमागील इतर बाजूंचा तपास सुरू आहे.
Ans: सातारा येथील 'यशदा टेक्निकल कॅम्पस'च्या वसतिगृहात ही घटना घडली असून, मृत तरुणी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील होती.
Ans: काही दिवसांपूर्वी कोल्हापूरहून परतताना झालेल्या अपघातात तिच्या खास मित्राचा मृत्यू झाला होता. या तीव्र नैराश्यातून तिने हे पाऊल उचलले.
Ans: पूजा माने असे मृत तरुणीचे नाव असून ती शिक्षणासाठी सातारा येथे राहत होती.






