(फोटो सौजन्य: X)
Crime News : खंडणी न दिल्याने रचला हत्येचा डाव; पोलिसांनाच धक्काबुक्की, दोघे अटकेत
रात्रीच्या सुमारास घडला सर्व प्रकार
माहितीनुसार, ही घटना पुणे-सातारा हायवेवरील सरोला गावात घडून आली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ज्यावेळी हत्या घडली त्यावेळी व्यक्तीसोबत त्याची पत्नी आणि मुलगा उपस्थित होता. रस्त्यावरुन संपूर्ण कुटुंबिय जात असताना अचानक मागून एक व्यक्ती तरुणावर चाकूने हल्ला करतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओत, आरोपी व्यक्तीला जमिनीवर पडेपर्यंत चाकूने भोकसून मारताना दिसून येतो. पतीवर झालेला हा हल्ला पाहून पत्नी घाबरते, ती रस्त्यावर मदतीसाठी आक्रोश करतो, इकडे-तिकडे फिरते, आरोपीवर बॅगने हल्लाही करते पण याचा काहीच उपयोग होत नाही. आरोपीच्या या हल्ल्यात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
मुलाने डोळ्यांदेखत पाहिला वडिलांचा मृत्यू
सदर घटनेदरम्यान व्यक्तीसोबत त्याचा मुलगाही घटनास्थळी उपस्थित होता. वडिलांवर हल्ला झाल्यानंतर तो घाबरला आणि जोरजोरात किंचाळू लागला. मुलाचा आक्रोश ऐकून हल्लेखोर आक्रमकपणे बायको आणि मुलाकडे वळतो पण दोघांनाही तो काही करत नाही. महिला मुलाला घेऊन मागे सरकते आणि मदतीसाठी किंचाळू लागते. यानंतर हल्लेखोर पुन्हा व्यक्तीकडे वळतो आणि दुसऱ्यांदा त्याच्यावर चाकूने वार करायला लागतो.
बाईकस्वाराने नाही केली मदत
या संपूर्ण घटनेदरम्यान एक बाईकस्वार घटनास्थळाकडे वळताना दिसतो. पण हैराण करणारी गोष्ट म्हणजे, मृत्यूचा थरार डोळ्यांसमोर दिसत असताना बाईकस्वार मदतीसाठी पुढे जात नाही. बाईकस्वारासमोरच आरोपी व्यक्तीवर चाकूने वार करतो पण चालक आपल्या डोळ्यांनी फक्त ते दृष्य पाहत राहतो. त्याच्या समोरच हल्लेखोर चाकूने व्यक्तीचा खून करतो आणि मग घटनास्थळावरुन फरार होतो.
Trigger Warning: Man Stabbed To Death. 📍Bhor, Pune, Maharashtra On the night of August 27, a man named Amar Pawar was walking with a woman and her young daughter when her husband, Deepak Pal, allegedly followed them from behind. Suspecting an illicit affair between his wife… pic.twitter.com/RRPUtDd9xK — زماں (@Delhiite_) August 28, 2026
पोलिसांचा तपास सुरु
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पिडिताच्या शरीरावर चाकूने अनेकदा वार केले होते ज्यामुळे त्याच्या शरीरावर भरपूर जखमा आढळल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजगड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाला आपल्या ताब्यात घेतले. स्थानिक तरुणांच्या मदतीने पोलिसांनी हल्लेखोराविषयी माहिती गोळा केली असून काही तासातच आरोपीला अटक करण्यात आली. पोलिस घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोळा केलेले सर्व पुराव्यांचा तपास सुरु केला असून या हल्ल्यामागचे खरे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.






