काय नेमकं घडलं?
या प्रकरणातील वकिलाचे नाव संजय सावंत असे आहे. ते पुण्यातील विधी शाखेचा अध्यक्ष आहे. तर हत्या झालेल्या सेक्रेटरीचे नाव पूनम दिनेश मुन (वय ३५) असे आहे. पूनम मुन या एडव्होकेट संजय सावंतच्या मुंढवा भागातील कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या. मात्र त्यांचे संजय सावंत यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय संजय सावंतची पत्नी स्वातीला होता. त्यातून पूनमसोबत त्यांचे वाद होत होते.
Beed Crime: लग्न आठवड्यावर असताना तरुण रेल्वे पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
गुरुवारी कार्यालयात एडव्होकेट संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि त्यांची अल्पवयीन मुलगी यांनी मिळून पूनम मुन यांना मारहाण सुरु केली. त्यांनतर पूनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांना बॅटने मारहाण केली. त्यामध्ये पूनम मुन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पूनम मुन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पूनम मुन यांचा मृतदेह पोत्यात भरून ते पोतं ऑफिसमध्येच लपवून ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाची व्हिलेवाट लावण्याच्या सावंत यांचा विचार होता. मात्र त्या आधीच त्यांचा कट समोर आला.
मृतदेह पोत्यात आढळला
दुपारच्या सुमारास पूनम यांचे पती दिनेश यांनी पत्नीला फोन केला; पण त्यांनी फोन उचलला नाही. रात्री आठ वाजले, तरीही पूनम घरी आल्या नाहीत, त्यामुळे दिनेशने ॲड. संजय सावंत याच्याशी मोबाइलवर संपर्क साधून पत्नी अद्याप घरी आली नसल्याचे सांगितले होते. त्या वेळी ॲड. सावंत याने पूनम मैत्रीण किंवा नातेवाइकांच्या घरी गेल्या असाव्यात, असे सांगितले. रात्री ११ वाजता कुटुंबीयांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पूनमचे पती उद्धव मुन यांनी पूनम घरी न आल्याने शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते एडवोकेट संजय सावंतच्या कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयात ऐक पोतं आढळून आलं. ते पोतं त्यांनी उघडून पाहिलं असता आतमध्ये पुनम मून यांचा मृतदेह आढळून आला. तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
आरोपी ताब्यात
पोलीसांनी संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केली आहे. त्यांची चौकशी पोलीस करत आहे. पूनम गेल्या साडेतीन वर्षांपासून सावंत याच्या कार्यालयात सहायक (सेक्रेटरी) म्हणून नोकरी काम करत होत्या. संशयातून वकिलाच्या पत्नीने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.






