Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात गुन्हेगारी वाढली! हौसेखातर पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन मुलगा जेरबंद; ‘Arm Act’ चा गुन्हा दाखल

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 03, 2025 | 06:57 PM
पुण्यात गुन्हेगारी वाढली! हौसेखातर पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन मुलगा जेरबंद; 'Arm Act' चा गुन्हा दाखल

पुण्यात गुन्हेगारी वाढली! हौसेखातर पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन मुलगा जेरबंद; 'Arm Act' चा गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पुणे:  हौसेखातर पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला सहकारनगर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. या अल्पवयीन मुलाकडून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे, सहाय्यक निरीक्षक सागर पाटील व त्यांच्या पथकाने केली.

शहरात अवैध पिस्तूलांची विक्री तसेच ते घेऊन फिरणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेकजन भिती पोटी आणि स्टेट्ससाठी पिस्तूल बाळगत असल्याचे दिसून आलेले आहे. त्यात तरुणाईत याची मोठी क्रेझ आहे. यादरम्यान, सहकारनगर पोलीस हद्दीत गस्त घालत असताना माहिती मिळाली की, के.के. मार्केट पार्किंगच्या जागेत एक मुलगा संशयितरित्या थांबला असून, तो कोणाची तरी वाट पाहत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने याठिकाणी सापळा रचून कारवाई केली. या मुलाला पकडल्यानंतर त्याच्या कंबरेला पिस्तूल मिळून आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत

 

पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरात गुन्हेगारांकडून वाहनांचे खळखट्याकचे प्रकार सुरूच असून, लोहगावनंतर आता धनकवडीत कोयतेधारी टोळक्याने कार तसेच दुचाकींची तोडफोड करून दहशत माजवली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहन तोडफोडीच्या घटना घडत असून, यामध्ये सर्व सामान्य नागरिक भरडले जात आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी टोळक्यावर गुन्हा दाखल केला असून, प्रकरणात साहिल दुधाणेला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पियुष मोहन चव्हाण (वय २०, रा. ओम शिवशंभो हाईट्स, मोहननगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दुधाणे याच्याशी चव्हाणचा वाद झाला होता. त्याचा राग दुधाणे याच्या मनात होता. बुधवारी रात्री आरोपी दुधाणे आणि साथीदारांनी चव्हाणला धनकवडी परिसरात अडवले.

हेही वाचा: Crime News : पुण्यात कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत; वाहनांची तोडफोड केली अन्…

जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

 

Web Title: Pune police arrest minor boy because carrying pistol sahkarnagar pune crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
1

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
2

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
3

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक
4

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.