Pune Police Combing Opration: ७२ ठिकाणी छापेमारी, ३७५ हॉटेल्स; गोळीबारानंतर पुणे पोलिसांचे रात्रभर कॉम्बिंग ऑपरेशन

शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात आरोपीवर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी संपूर्ण शहरात रात्रीची विशेष शोधमोहीम राबवली. यामध्ये गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-२ (ANC) ने तब्बल १ कोटी ५१ लाख २० हजार रुपये किमतीचा २५० किलो गांजा जप्त केला आहे.
Pune Police Raid 375 Hotels and Lodges, Book 114 Drivers During Three-Hour Special Drive
पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये! रात्रभर 'कॉम्बिंग ऑपरेशन,दीड कोटींचा २५० किलो गांजा जप्तPune Police, Combing Operation, Amitesh kumar, Pune Crime, Drug Bust
Published on: 
Updated on: 
  • रात्री १० ते पहाटे १ वाजेपर्यंत शहरात विशेष शोधमोहीम

  • १.५१ कोटींचा २५० किलो गांजा आणि बेकायदेशीर शस्त्रे जप्त

  • ७२ ठिकाणी छापेमारी, ३७५ हॉटेल्स व १,५१७ वाहनांची तपासणी

Pune Police Combing Opration: शिवाजीनगर न्यायालय परिसरात मंगळवारी हत्येच्या आरोपीवर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी संपूर्ण शहरात विशेष शोधमोहीम राबवली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार मंगळवारी (२५ नोव्हेंबर) रात्री १० ते बुधवारी पहाटे १ या वेळेत ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस सहआयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, शहरातील सातही परिमंडळांचे पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी सहभाग घेऊन गुन्हेगारांची झाडाझडती, नाकाबंदी आणि बेकायदेशीर शस्त्रांविरोधात धडक कारवाई केली.

Pune Police Raid 375 Hotels and Lodges, Book 114 Drivers During Three-Hour Special Drive
Bhandara News: गावोगावी विहिरी बनल्या कचराकुंड्या! साकोली-भंडाऱ्यात जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाची गरज...

या कारवाईदरम्यान पुणे पोलिसांनी शहरातील ७२ ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन राबवले, तर ४३ ठिकाणी नाकाबंदी करून १,५१७ वाहनांची तपासणी केली. या तपासणीत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ११४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच, शहरातील ३७५ हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसची झडती घेण्यात आली असून १७७ संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ६८ ठिकाणी 'फिक्स पॉइंट' गस्तही घालण्यात आली.

मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-२ (ANC) ने मोठी कारवाई करत २५० किलो गांजा जप्त केला आणि दोन आरोपींना अटक केली. जप्त केलेल्या या अंमली पदार्थांची किंमत १ कोटी ५१ लाख २० हजार रुपये इतकी आहे. याशिवाय, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करून दोन आरोपींना अटक करत तीन शस्त्रे जप्त केली, तर बेकायदेशीर अग्निशस्त्रप्रकरणी एक गुन्हा दाखल करून एका आरोपीकडून एक शस्त्र जप्त करण्यात आले. दारूबंदी आणि जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही तीन कारवाया करण्यात आल्या.

Pune Police Raid 375 Hotels and Lodges, Book 114 Drivers During Three-Hour Special Drive
CJP Leader Targets PM Modi: सौरव दास यांची विमानतळावर अडवणूक; आशुतोष-अभिजीत यांचा थेट केंद्रावर निशाणा

पोलिसांनी विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या ४३ फरार आरोपींचा शोध घेण्यासोबतच रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही कसून तपासणी केली. यामध्ये तुरुंगातून सुटलेल्या ७१४ आरोपींपैकी ३२४, जबरदस्ती चोरी व चेन स्नॅचिंगमधील २१३ पैकी ४५, एनडीपीएस (NDPS) गुन्ह्यांतील १४७ पैकी ६६ आणि पोक्सो (POCSO) गुन्ह्यांतील १२१ पैकी ४६ आरोपी मिळून आले. तसेच, शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केलेल्या ७ आरोपींचीही तपासणी करण्यात आली.

गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्रे आणि अवैध धंद्यांना आळा घालून पुणे शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहतील, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.