शैक्षणिक वातावरणाला घातक ठरणारी नशेसाठी वापरली जाणारी औषधे व अमली पदार्थांची छुपी विक्री ही गंभीर सामाजिक समस्या बनत चालली होती. याविरोधात नशामुक्त अभियान सुरु करण्यात आले आहे.
सावरी गावातील कोयनेच्या बॅकवॉटर परिसरात स्विमिंग टँक, रिसॉर्ट आणि पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. गाव किंवा वस्ती नसतानाही ७५ लाख रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित…
तामिळनाडूमध्ये २०१९ मध्ये १०८ मृत्यू झाले होते, जे २०२१ मध्ये २५० वर गेले, परंतु २०२३ मध्ये ६५ वर आले. पंजाबमध्ये २०२२ मध्ये १४४ मृत्यू झाल्यानंतर २०२३ मध्ये ८९ मृत्यूंची नोंद…
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक कोंडीला आधीच स्थानिक वैतागले आहेत त्यात आता नवीन भरीरा भर म्हणजे मुंबई-अहमदाबाद मार्गावर ड्रग्सचा कारखाना जप्त करण्यात आलेला आहे.
: कफ सिरप घोटाळ्यानंतर फक्त एकाच राज्यात झालेल्या तपासणीत पॅरासिटामॉल, ओआरएस सोल्यूशन, सामान्य डोळ्यांचे थेंब आणि फेस वॉश यांसारखी शेकडो सामान्यतः वापरली जाणारी औषधे दूषित किंवा निकृष्ट दर्जाची आढळून आली.
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य पोलीसांच्या अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या “नशामुक्त भारत अभियान” राबवण्यात आले. यावेळी पोलिसांनी खास सूचना दिल्या आहेत.
Fentanyl Crisis US : दरवर्षी अमेरिकेत हजारो लोक एका औषधामुळे आपले प्राण गमावत आहेत. त्याचे नाव फेंटानिल आहे. हे एक विष आहे जे दिसायला सामान्य आहे, परंतु प्रत्यक्षात ते हिरोइनपेक्षा…
पुण्याच्या मध्यभागात मध्यरात्री क्रमांक नसलेली दुचाकी घेऊन अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे.
नागपुरात शहरात गेल्या दीड वर्षात ७३० जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षात नागपूर शहरात आठ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची जप्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल…
परदेशी नागरिकाकडून सापडलेले अंमली पदार्थ जप्त करत त्याला अटक कऱण्यात आली असून त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ (एनडीपीएस कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
अंबरनाथ शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी धडक कारवाई केली. पश्चिम भागातील भगतसिंग नगर परिसरात पोलिसांनी धाड टाकून काही प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले.
सातारा शहर परिसरामध्ये बेकायदेशीररित्या १० किलो ६२० ग्रॅम गांजा बेकायदेशीररित्या घेऊन जाणाऱ्या एका युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे.