सराईत गुन्हेगार फरार होण्याच्या होता तयारीत, पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या; पुण्यातील एसटी स्थानकात कारवाईचा थरार
अक्षय फाटक/ पुणे
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार होण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी एसटी स्थानकाच्या आवारात सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईचा बस स्थानकात थरार पहायला मिळाला. त्यामुळे प्रवासी कुतूहलाने पोलिसांच्या या कारवाईकडे पहात होते. तो सोलापूरला पळून जाण्याच्या तयारीत होता.
अमोल रवी आडम (वय २४ रा. प्रथमेश अपार्टमेंट, शंकरनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल कोळंबीकर, संजय भापकर, कुंदन शिंदे, शंकर संपत्ते, सागर केकाण, राहुल तांबे, सुधीर इंगळे, सतीश कुंभार, विक्रम सावंत, शरद गोरे यांनी ही कारवाई केली.
अमोल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यात अपहरण, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्थान बद्धतेची कारवाई केली होती. तो नुकताच या गुन्ह्यातून सुटून बाहेर आला होता.
दरम्यान आडम आणि साथीदारने १७ डिसेंबर रोजी कात्रज भागातील आंबेगाव परिसरात दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. गुन्हा केल्यानंतर तो पसार झाला होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. यावेळी स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे व राहुल तांबे यांना माहिती मिळाली की, आडम मूळगावी सोलापूर जाणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात सापळा लावला. अमोल आडम बस स्थानकात आल्यानंतर सोलापूर बसकडे जात असताना त्याला पथकाने त्याला पकडले.
जुन्नर तालुक्यातील आपटाळे येथील पत्रकार संदीप उत्तर्डे यांना मागील तीन वर्षांपूर्वी दिलेल्या बातमीचा आकस मनात धरून त्यांना फोनवर शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी येथील स्वयंघोषित समाज सेवक अक्षय मोहन बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी व पत्रकारांच्या वतीने आज गुरुवार दि. २० रोजी काळ्या फिती लावून जुन्नर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला.
पत्रकार संदीप उत्तर्डे यांना दि (१७) रोजी शिरोली, बु.” ता.जुन्नर येथील अक्षय मोहन बोहाडे यांने तीन वर्षापुर्वी केलेल्या बातमीचा राग मनात धरून दुरध्वनीवरुन शिवीगाळ करत धमकी देऊन दोन तीन दिवसात मी काय करतो ते पहा असे म्हणून घातपात करण्याची धमकी दिली. याबाबत सर्व पत्रकारांच्या वतीने जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर,जेष्ठ पत्रकार रवींद्र कोल्हे, सचिन कांकरिया,किरण वाजगे, संजोग काळदंते, रमेश तांबे,सुरेश वाणी,सुरेश भुजबळ,पराग जगताप,मंगेश पाटे,संजय थोरवे,अरुण मोरे,नितीन गाजरे,किरण साबळे,अमोल गायकवाड,पवन गाडेकर नितीन ससाणे,प्रवीण फल्ले,भरत अस्वार,नयन डुंबरे,महेश घोलप,मनोहर हिंगणे,अमर भागवत,राजेश कणसे अशपाक पटेल,सोनू गाडे तसेच जुन्नर तालुका पत्रकार संघ,जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघ,शिवजन्मभूमी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.