पुणे: आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू सुमित भागवत गुट्टे (वय 24) पुण्यातून बेपत्ता झाला आहे. तो 1 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला होता आणि परतला नाही. सुमितने घरच्यांना ज्यूपीटर हॉस्पिटलमध्ये मुलाखतीसाठी जात असल्याचे सांगितले होते, मात्र त्यानंतर तो अद्याप घरी परतलेला नाही. या घटनेबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एक जानेवारीला ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये मुलाखतीसाठी जात असल्याचे सांगत सुमित घरातून बाहेर पडला. दोन तासांमध्ये घरी येेईल,असेही त्याने सांगितले होते. पण गेल्या तीन चार दिवसांपासून तो घरी परतलाच नाही. सुमित गुट्टेने दुपारी 3 वाजता घरी शेवटचा फोनही केला होता, त्यावेळी त्याचे घरच्यांशी बोलणेही झाले पण त्यानंतर त्याचा फोन बंद आहे. असी माहिती रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Koyana Earthquake News: कोयना परिसरात भुकंपाचा धक्का
रत्नाकर गुट्टे म्हणाले की, माझा नातू गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे आम्ही सगळे वेगळ्याच दु:खात आहोत. मी परभणीत झालेल्या आक्रोश मोर्चात सहभागी होणार होतो. पण नातूच बेपत्ता असल्यामुळे मी तिकडे जाऊ शकलो नाही. एक जानेवारीपासून नातून सुमित मिसिंग आहे. भाचीने अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन बंद आहे. 1 जानेवारीला तो सकाळी 9 वाजता घराबाहेर पडला होता. त्यानंतर दुपारी 3 वाजता त्याच्याशी शेवटचं बोलण झालं होतं, याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. पण त्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणात आम्ही पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
कितीही प्रयत्न केले तरी कधीच होणार नाही तुमचा स्मार्टफोन Hacked, फक्त या 5 गोष्टी करा
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नाकर गुट्टे यांनी दणदणीत विजय मिळवला. यावेळची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे या निवडणुकीत प्रमुख दावेदार मानले जात होते. मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक फेरीत ते पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होते. अखेरीस त्यांनीच विजय मिळवत गंगाखेड मतदारसंघातून पुन्हा आमदारपदाची जबाबदारी सांभाळण्याचा मान मिळवला. या निवडणुकीत विशाल कदम दुसऱ्या स्थानावर, तर सीताराम घनदाट तिसऱ्या स्थानावर राहिले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राजकारण नेहमीच रंगतदार राहिले आहे. 2019 पूर्वी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. मधुसूदन केंद्रे आमदार होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी विजय मिळवला. त्यावेळी पाच बलाढ्य उमेदवारांत तीव्र स्पर्धा झाली होती. त्या निवडणुकीत रासपकडून रत्नाकर गुट्टे, शिवसेनेकडून विशाल कदम, तर वंचित बहुजन आघाडीकडून करुणा कुंडगीर हे मैदानात होते. तसेच माजी आमदार सीताराम घनदाट यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.