Photo Credit- Social Media
Satara Earthquake News: कोयना धरण परीसरात आज सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. हा भुकंपाचा धक्का 2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असावा, अशी शक्यता आहे. धरणाचा पूर्वेकडील परीसरात हा भूकंपांचा धक्का बसला. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण या भुकंपाच्या धक्क्याने 1967 साली घडलेल्या महप्रलायकरी भूकंपाचा आठवणी जाग्या झाल्या. भूकंपाने कोयना धरणाला धोका नाही.
1967 साली कोयना परिसरात झालेला भूकंप हा महाराष्ट्रासाठी खूप मोठा धक्का होता. हा भूकंप 11 डिसेंबर 1967 रोजी रात्री 4.05 वाजता झाला होता. या भूकंपाची तीव्रता 6.5 रिश्टर स्केल इतकी होती, जी महाराष्ट्रात झालेल्या भूकंपांपैकी सर्वाधिक तीव्रतेच्या भूकंपांपैकी एक मानली जाते. कोयना धरणाजवळ, विशेषतः पाटण तालुक्यातील परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे सुमारे 200 जणांचा मृत्यू झाला आणि 1,500 हून अधिक जण जखमी झाले. तसेच, अनेक घरे उद्ध्वस्त झाली.
भूकंपाचे नेमके कारण निश्चितपणे सांगता येत नसले तरी तज्ज्ञांच्या मते, यामागे कोयना धरणात साचलेल्या पाण्याचा दाब (Reservoir Induced Seismicity) हे महत्त्वाचे कारण होते. धरणाच्या पाण्याच्या वजनामुळे भूकंपीय हालचालींना चालना मिळाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.
या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्थापित झाली. कोयना धरणाची काही भागांत किरकोळ तडे गेले, परंतु धरणाची संरचना स्थिर राहिली आणि मोठे नुकसान टळले. हा भूकंप भारतीय भूगर्भशास्त्र आणि भूकंप संशोधनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. कोयना परिसरातील भूकंपीय हालचालींचा अभ्यास सुरू करण्यात आला.
हरियाणातील सोनीपतमध्येही भुकंपाचे तीव्र धक्के
दुसरीकडे, हरियाणातील सोनीपतमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज रविवारी पहाटे ३ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. आजच्या भूकंपामुळे सुमारे 10 किलोमीटर भूगर्भात हालचाल जाणवली. एनसीएसनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.0 इतकी होती. सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
याआधी 25 आणि 26 डिसेंबरला दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. ते 25 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12:28 वाजता 31 सेकंदांसाठी पोहोचले. त्यावेळी भूकंपाचे केंद्र सोनीपतचे कुंडल गाव होते. 26 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9:42 वाजता 3 सेकंदाचा भूकंप झाला, त्यावेळी त्याचे केंद्र प्रल्हादपूर हे गाव होते. सोनीपत हे आजच्या भूकंपाचे केंद्र होते.
‘मेलो तरी चालेल’ असं म्हणत शेतकऱ्याने अंगावर ओतले पेट्रोल; कारणही आलं समोर…