औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसापासून महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहोत. अशीट एक घटना औरंगाबामध्ये उघडकीस आली आहे. शहरातील नामांकित शाळेत अवघ्या 8 ते 9 वर्षाच्या तीन विद्यार्थींनींसोबत एका रिक्षाचालकाने दुसऱ्याच्या व्हॅनमध्ये बसून अश्लील संवाद साधत विकृत चाळे केले. या धक्कादायक प्रकारानंतर घाबरलेल्या दाेन मुली तापाने फणफणल्या. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. विकास विठ्ठल बनकर (४३, रा. आंबेडकरनगर) आणि राजू मोहन रुपेकर (४८, रा. पिसादेवी परिसर) अशी त्यांची नावे आहेत.
[read_also content=”ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, मायलेकरांसह पाच जण ठार, तीन जखमी https://www.navarashtra.com/maharashtra/five-people-including-milekar-killed-three-injured-in-fatal-accident-involving-tractor-of-sugarcane-workers-nrps-353424.html”]
आठ ते नऊ वर्षाच्या तीन मुली शहरातील नामांकित शाळेत असून या तिघी एकाच परिसरात राहतात. त्यांना रोज शाळेत सोडायला राजू नावाचा एक ड्रायव्हर येतो. राजूचा मित्र आरोपी विकास हा नेहमी शाळा सुटल्यावर त्याच्याशी बोलयला त्याच्या व्हॅनजवळ येत होता. मात्र , त्यांची घाणेरडी नजर त्या तीन मैत्रींणींवर होती. तो नेहमी संधीचा फायदा घेत राजूच्या व्हॅनमध्ये जाऊन बसायचाआ आणि या मुलींसाेबत विकृत चाळे करत होता. याबाबत या मुलींपैकी एकीनो घरी पालकांना सांगितल्या नतरं हा प्रकार उघडकीस आला.
[read_also content=”चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी 10 पोलिसांच निलंबन मागे https://www.navarashtra.com/maharashtra/important-update-about-chandrakant-patil-ink-throw-case-nrps-353422.html”]
७ डिसेंबर रोजी विकासने या मुलींसाेबत विकृत चाळे केले. यावेळी मात्र, घरी गेल्यानंतर दोनं मुली भितीनं अक्षरश: तापाने फणफणल्या. करुणाने शाळेत जाण्यास नकार दिला. तिच्या आईने विश्वासात घेतल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी त्या दोघांना रंगेहाथ पकडण्याचे ठरवले. सोमवारी दुपारी शाळा सुटताच विकास पुन्हा व्हॅनजवळ गेला. मुलींनी लांब उभ्या पालकांना खुणावले. त्यांनी धाव घेत त्याला चोप दिला. पळून जाण्याच्या तयारीत असलेला राजू हाती लागल्याने जमावाने त्याला बदडले. सिडकोचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांना शाळेत पाठवले. त्यांनी जमावाच्या तावडीतून सुटका करत आराेपींना ठाण्यात नेले. वायदंडे यांनी तत्काळ दोघांवर विनयभंग व बाललैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली. तिन्ही मुलींचा जबाब नोंदवला.