निनाईदेवीसह काळंबादेवीच्या मंगळसुत्रांवर चोरट्यांचा डल्ला; 60 हजारांचा मुद्देमाल लंपास
सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला मारण्याचे सुरूच ठेवले आहे. आरगनंतर लक्ष्मीवाडी येथे महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी मंदिरात ठेवण्यात आलेल्या दानपेटीतील रक्कम तसेच गाभाऱ्यात प्रवेश करत देवीच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिनेसह लंपास केले आहे. यात साधारण लाखो रुपयांचा ऐवज लांबविला आहे.
सांगली जिल्ह्यातील आरग येथील पद्मावती देवीच्या मंदिरात चोरी करत 18 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना चार दिवसांपूर्वीच घडली आहे. यानंतर चोरट्यांनी मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी केल्याचे समोर आले आहे. यामुळे आता मंदिर देखील सुरक्षित राहिले नसल्याचे बोलले जात आहे.
पैसे काढून दानपेटी फेकली ओढ्यात
महालक्ष्मी मंदिरात चोरट्यांनी प्रवेश करत दानपेटी उचलून नेली. तसेच अडीच तोळे सोने आणि दोन किलो चांदीचे दागिने देखील चोरून नेले आहेत. दरम्यान, चोरीनंतर चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील पैसे काढून घेतले. यानंतर दानपेटी गावातल्या ओढ्यामध्ये फेकून दिली आहे. त्याचबरोबर चोरीच्या वेळी मंदीर परिसरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी लंपास केला आहे.
चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळवला
सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. मंदिरातील दानपेटी तसेच देवाच्या अंगावरील आभूषण चोरून नेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या डीव्हीआर लांबविल्याने चोरट्यांची ओळख पटू शकलेली नाही.
पद्मावती मंदिरात घडला चोरीचा प्रकार
काही दिवसांपूर्वीच गावानजीक असणाऱ्या आरगमध्ये पद्मावती मंदिरात चोरीचा प्रकार घडला होता. त्या पाठोपाठ लक्ष्मीवाडी येथे घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे तालुक्यातल्या गावांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्हीचा बॅकअप पाहिले जात आहे.
चोरट्यांकडून 8 लॅपटॉप जप्त
दुसऱ्या घटनेत, सासवडमध्ये घड्याळ चोरीच्या आरोपावरून अटक केलेल्या आरोपीकडून तब्बल आठ लॅपटॉप आणि नऊ मोबाईल संच जप्त केले आहेत. सासवड पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने आपले कारनामे सांगितले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागात चोऱ्या करून सासवड मधील साठेनगर मध्ये एका झोपडीत राहायचा तसेच चोरी केलेल्या वस्तू तामिळनाडू राज्यात नेवून विकत असे. त्यामुळेच चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागत नव्हता. मात्र आरोपी मुद्देमालसह ताब्यात आल्याने अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.