कवठेमहांकाळ येथील डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी बनावट आयकर अधिकारी बनून छापा टाकणाऱ्या चोरट्यांच्या टोळीतील तिघांना अवघ्या ६० तासात पोलिसांनी जेरबंद केले आहे.
जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याने कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगलीतील बायपास पुलाजवळ नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
सांगलीच्या तासगाव तालुक्यातील पाचवा मैलजवळील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहे.
सांगलीच्या मिरज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला चाकू भोसकल्याची घटना समोर आली आहे. हल्ला झालेल्या तरुणाचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात भरदिवसा तिघा जणांनी एका रेकॉर्डवरील गुंडांचा पाठलाग करत त्याची धारदार हत्यारांनी वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.
नांगोळे-ढालगाव रस्त्यालगत पाटील कुटुंबीयांचे घर आहे. घरामध्ये अल्लाउद्दीन मकबूल पाटील, रमेजा अल्लाउद्दीन पाटील, समीर अल्लाउद्दीन पाटील व काजल समीर पाटील यांच्यासह दोन लहान मुले राहतात.
कुपवाड एमआयडीसीमधील बंद अवस्थेत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासमोरील रस्त्यावर एका युवकाचा मृत्यूदेह सापडून आला. युवकाचा नाव उमेश मच्छिंद्र पाटील (वय २१, रा. श्रीनगर, मशिदीजवळ, कुपवाड ) असे आहे.
कमी मार्क पडल्याच्या रागातून शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या वडिलाने आपल्या पोटच्या मुलीला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण केली. मारहाणी नंतर मुलीने जीव सोडला. तिच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.
सांगलीतील मिरज येथील भरदिवसा गोळीबाराची घटना समोर आली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. ही घटना शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर घडली आहे. पोलिसांनी संचयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
सांगली (Sangli) महापालिकेचे उपायुक्त ७ लाखांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. उपायुक्त वैभव साबळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी १० लाखांची खंडणी मागितली होती, असा आरोप करण्यात आला…
फोरेक्स ट्रेडिंगच्या दाखल गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून एका व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना पलूस पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
एक 6 वर्षाच्या चिमुकला एका नराधमाच्या वासनेचा शिकार झाला आहे. त्यांनी त्या या चिमुकल्याबरोबर किळसवाणे कृत्य केल्याचेही समोर आले आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरामध्ये घडली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावातील तरुणी पुण्यात नोकरीनिमित्त राहते. परवा ती स्वारगेट ते सांगली या शिवशाही बसमधून गावी जाण्यासाठी निघाली होती.
जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने २४ तासांत वयोवृद्ध महिलेला लुटणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. आरोपीने चोरलेला १ लाख ३५ लख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हॉटेलच्या पार्किंगमधून ट्रक चोरून कर्नाटकात स्क्रॅप करणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली असून, एक पसार आहे.
सांगली जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात व्यापार करण्यासाठी 'क्यूआर कोड' प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समितीकडे नोंदणी करावी लागणार आहे.