
Satara Doctor Death Case:
दरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून नियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली असून, राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, न्याय मिळावा यासाठी कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
Uttar Pradesh: प्रियकर–प्रेयसीनं हातात हात धरून ट्रेनसमोर मारली
या प्रकरमात अक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. फलटण डॉ. तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली होती. त्यानंतर आज राहुल गांधींनी तरूणींच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी आज फोनवरून कुटुंबांकडून सर्व माहिती जाणून घेतली. आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही पीडित कुटुंबाकडून करण्यात आली.
डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील कुटुंबासोबत राहुल गांधी यांनी मराठीतून संवाद साधला. राहुल गांधी यांनीदेखील पीडित कुटुबांने आपली व्यथा मांडली. राहुल गांधींनीदेखील सर्व काही ऐकून घेतलं. राहुल गांधींनी ‘तुम्हाला आता काय हवं आहे? ‘ असा प्रश्न विचारला. त्यावर, या प्रकरणी ‘SIT चौकशी करण्यात यावी आणि आरोपींना फाशी दिली जावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली. तर यावेळी राहुल गांधी यांनीदेखील होकार देत तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या पाठीशी आहोत, असं सांगत त्यांना आश्वासन दिले.
Nashik News: विधिसंघर्षित बालकांचे पालकही रडारवर, पोलिसांनी घेतली कठोर भूमिका
त्यादरम्यान, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पोलिस प्रशासनावर दबाव असून पोलीस चौकशी करत नाहीयेत, असा गंभीर आरोप केला. सपकाळ म्हणाले की, डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात थेट मुख्यमंत्री फडणवीसांचा पोलिसांवर दबाव आहे. त्यामुळेच पोलिस या प्रकरणात कोणतीही चौकशी करत नाहीयेत. आज या प्रकरणात एकही सत्ताधारी आमदार बोलायला तयार नाही. संपदा मुंडे ज्या समाजाच्या आहेत, त्या समाजाचे सात आमदार आहेत. पण तेही यावर बोलायला तयार नाहीत. त्यांच्यावरही फडणवीसांचा दबाव आहे.
“पंकजा मुंडे यांनी ठाम भूमिका घ्यावी. जोपर्यंत डॉक्टर तरुणीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळात राहायचं की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता, मग या प्रकरणात सत्ताधारी गप्प का? नारायणगड आणि भगवानगड येथील संतांनी या कन्येला न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका घ्यावी. पुढील काळात या कुटुंबाच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही करू.” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.