सतीश वाघ यांचेही अनैतिक संबंध...; पोलिस तपासात माहिती उघड (फोटो सौजन्य-X)
Satish Wagh Case News In Marathi : भाजपचे विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर यांच्या काकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. योगेशचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह 9 डिसेंबर रोजी यवत येथून पुणे-सोलापूर महामार्गालगत आढळून आला होता. त्यांचा मृतदेह कारमध्येच पडला होता आणि त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी आता पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी हिला अटक केली आहे. मोहिनीने ५५ वर्षीय सतीश वाघ यांची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र याचदरम्यान आता या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर आता पोलिस तपासावेळी मोहिनी सतीश वाघ हिने आपल्या पतीवरती बाहेर त्यांचे अनैतिक संबंध असल्याचे आणि छळवणुकीचे आरोप केले आहेत.
पोलिसांचे म्हणणे आहे की, अक्षय जवळकर हा पूर्वी सतीश वाघच्या घरात भाड्याने राहत होता. यादरम्यान पत्नी मोहिनी आणि अक्षय यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या वयात सुमारे 20 वर्षांचा फरक होता. त्यानंतरही त्यांचे अवैध संबंध सुरूच होते. या नात्याची माहिती सतीश वाघ यांना समजताच ते संतापले. त्याने अक्षय जवळकरला खोली रिकामी करायला लावली. यानंतरही तो पत्नीच्या संपर्कात राहिला. दोघांमध्ये चर्चा आणि भेटीगाठी सुरूच होत्या. याबाबत पुन्हा सतीश वाघ यांना समजले असता त्यांनी आक्षेप व्यक्त केला. यामुळे मोहिनीने त्याला मार्गावरून हटवण्याचा निर्णय घेत अक्षय जवळकरला सतीश वाघला मार्गातून हटवण्यास सांगितले.
मोहिनीच्या सांगण्यावरून अक्षयने सतीश वाघच्या नावाने 4 जणांना 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती. या 4 नराधमांनीच सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. अपहरणाच्या ठिकाणापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. पुण्यातील शेवाळवाडी चौकाजवळ त्यांचे अपहरण करून त्यांना कारमधून नेण्यात आले. एसीपी क्राइम शैलेश बलकवडे म्हणाले, ’48 वर्षीय मोहिनी वाघ यांना बुधवारी अटक करण्यात आली. तिने पतीच्या हत्येचा कट रचल्याचे काही पुराव्यांवरून समजले. तपासादरम्यान मोहिनीने तिचा जुना भाडेकरू अक्षय जवळकर याला सतीश वाघचा खून करण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अक्षयने हत्येसाठी अन्य चार जणांना ५ लाख रुपयांची सुपारी दिली होती.
जवळकर यांचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून सतीश वाघ यांच्या घरात भाड्याने राहत होते. यादरम्यान मोहिनी आणि अक्षयमध्ये नाते निर्माण झाले. या मुद्द्यावरून सतीश वाघ याने मोहिनीला अनेकदा मारहाण केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोहिनी वाघ आणि अक्षय व्यतिरिक्त पोलिसांनी पवन श्याम सुंदर शर्मा, नवनाथ अर्जुन गुरसाळे, आतिश जाधव आणि विकास सीताराम शिंदे यांना अटक केली आहे. या प्रकरणात आश्चर्याचे कारण म्हणजे मोहिनी अक्षयपेक्षा 20 वर्षांनी मोठी होती. त्यानंतरही दोघांमध्ये अवैध संबंध निर्माण झाले.
पोलिस तपासावेळी पती सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध होते. माझाही तो गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करीत होता. हा सर्व त्रास असह्य होता, असा धक्कादायक खुलासा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली त्यांची पत्नी मोहिनी हिने काल झालेल्या पोलिसांच्या चौकशीत केला आहे. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.