मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. अक्षय शिंदे हा बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी होता. मात्र, चौकशी अहवालात हे स्पष्ट झाले की, त्याच्या बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स सापडले नाहीत. यामुळे या एन्काऊंटरच्या सत्यतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत आणि न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरत कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. तळोजा कारागृहातून नेत असताना मुंब्रा बायपास य़ाठिकाणी त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवरच गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्यांच्यावर गोळीबार केला, यातच त्याचा मृत्यू झाला.
भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स वित्तीय सेवा यांची डिजिटल प्लॅटफॉर्म तयार
बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने चौकशी अहवाल सादर केला चौकशी समितीने दाखल केलेल्या अहवालात मात्र बंदुकीवर अक्षयच्या हातांचे ठसे आढळलेच नाहीत, असं म्हटलं आहे. क्षयला तळोजा कारगृहातून दुसऱ्या कारागृहात नेत असताना मुंंब्रा बायपासवर वाटेत त्याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यी झाला. अक्षय शिंदेंने पोलिसांची बंदूक हिसकावल्यामुळे पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याचा दावा पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आला होता. पण पोलिसांचा हा दावा न्यायालायात टिकला नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांच्या जबाबांना संशयास्पद मानले आहे. “स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, हे पोलिसांचे म्हणणे पटण्याजोगे नाही; उलट हे संशयास्पद आहे,” असे न्यायालयीन चौकशीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सरकारी वकिलांनी न्यायालयाला आश्वासन दिले की, “कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.” दरम्यान, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या वतीने खटला लढवणारे वकील अमित कटारनवरे म्हणाले की, “ही बनावट चकमक असून ही एकप्रकारची हत्या आहे, हे मॅजिस्ट्रेटच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, अशी आमची मागणी होती.”
Trident Hotel Woman Dead : मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आढळला 60 वर्षीय महिलेचा
याप्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांनी मॅजिस्ट्रेट अहवालाचा आढावा घेतला. पोलीस व्हॅनमध्ये असताना अक्षयने बंदूक खेचून गोळीबार केला आणि त्यात एक पोलीस जखमी झाला, त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला, असे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, मॅजिस्ट्रेट अहवालात ही चकमक बनावट असल्याचे दाखवले गेले. आता या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी आता संजय शिंदे (पीआय), निलेश मोरे (उपनिरीक्षक), अभिजीत मोरे (हवालदार), हरिश तावडे (हवालदार) यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे..