मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आढळला 60 वर्षीय महिलेचा मृतदेह
Mumbai Crime news Marathi : मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरातील ट्रायडंट हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (19 जानेवारी) सकाळी हा मृतदेह आढळून आला.संबंधित महिला ट्रायडंट हॉटेलमध्ये २७ व्या मजल्यावरील खोलीत राहत होती. रविवारी सकाळी ती खोलीत मृतावस्थेत आढळून आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मरीन ड्राइव्ह पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
विनती मेहतानी असे मृतावस्थेत आढळलेल्या ६० वर्षीय महिलेचे नाव आहे. मुंबईतील कफ परेड परिसरातील रहिवाशांकडून ही माहिती मिळाली आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये कशासाठी गेल्या होत्या याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. घटनेच्या दिवशी ट्रायडंट हॉटेलच्या २७ व्या मजल्यावरील एका खोलीत राहात होत्या. रविवारी सकाळी हॉटेल स्टाफने रुम सर्व्हिसिंगसाठी दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर शेवटी हॉटेल कर्मचाऱ्यांनी मास्टर चावीने दरवाजा उघडला. तेव्हा संबंधित महिला मृतावस्थेत दिसून आली. रविवारी सकाळी 6 वाजता ही घटना उघडकीस आली. हा प्रकार समोर येताच मरीन ड्राइव्ह पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. संबंधित महिला हॉटेलमध्ये कधी आणि कशासाठी आली? यासंबंधीची माहिती अद्याप मिळाली नाही. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
प्राथमिक तपासानुसार, संबंधित महिला रुग्ण काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त होती. जर मी तुला पाहिले असते तर तुला आजार झाला असता. या आजाराने ग्रस्त असलेली महिला मानसिक ताणातून जाते. या व्यक्तीचा मृत्यू असा आहे, ही जगण्याची पद्धत आहे. या प्रकरणात पोलिसांना कोणताही संशयास्पद व्यक्ती आढळला नाही. त्या पोलीस महिलेचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवायचा आहे. या प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण सांगण्यात आले. मरीन ड्राइव्ह पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
विनती यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र त्या दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू पेडर रोड भागात राहत होत्या, अशी माहिती समोर आली आहे. विनती आपल्या वृद्ध आई सोबत राहत होत्या. विशेष म्हणजे विनती आणि त्यांच्या मातोश्री अशा दोघीही काही काळापासून आजारी होत्या.
दरम्यान, विनती मुंबईच्या रहिवासी असूनही जवळच्याच हॉटेलमध्ये राहायला का आल्या होत्या, हे समजलेले नाही. त्या एकट्याच होत्या की त्यांच्यासोबत अन्य कोणी होते, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, त्यांच्यासोबत काही घातपात घडला आहे का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. त्यांचा मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.