Pune Crime: पुण्यात खळबळ! बँकेबाहेर बेवारस बॅग अन् पोलिसांची धावपळ, बॉम्बशोधक पथकाची तपासणी

Pune Crime: पुण्यात सातत्याने बॉम्ब ठेवल्याचे फेक मेल येत आहेत. त्यात शुक्रवारी दुपारी येथील बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँकेबाहेर एक बेवारस बॅग आढळून आली.
Pune Crime News
पुण्यात संशयित बॅगेने खळबळ (फोटो- आई gemini)
Published on: 
Updated on: 
  • पुण्यात संशयित बॅगेने खळबळ; बॉम्बशोधक पथकाची तपासणी

  • १५ ऑगस्ट चौकातील बँकेबाहेर बॅग आढळल्याने परिसर मोकळा

  • तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही

Pune Crime: पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या १५ ऑगस्ट चौकात एका बँकेबाहेर संशयित बॅग आढळल्याने काही काळ खळबळ उडाली. संशयास्पद वस्तू असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी परिसर रिकामा केला. बॉम्बशोधक (Crime) आणि नाशक पथकाला पाचारण करून बॅगेची तपासणी करण्यात आली. मात्र, बॅगेत काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी सुटकेच निविश्वास सोडला. 

पुण्यात सातत्याने बॉम्ब ठेवल्याचे फेक मेल येत आहेत. त्यात शुक्रवारी दुपारी येथील बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँकेबाहेर एक बेवारस बॅग आढळून आली. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. बॅगेची तपासणी सुरू असताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून चौकातील परिसर काही काळासाठी मोकळा करण्यात आला होता. 

माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस... रिक्षाचालकांनीही नकार दिला अन् रुग्णवाहिकेशी संपर्क तुटला; मंदारच्या वकिलाची हतबलता समोर!

बॉम्बशोधक पथकाने बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू आढळली नाही. त्यामुळे बॅगेबाबत निर्माण झालेली भीती दूर झाली. तपासणीनंतर हा प्रकार अफवा असल्याचे स्पष्ट झाले. 

मंदार किवळे हल्लाप्रकरणी मुख्य आरोपीला कोठडी

जिल्हा न्यायालय परिसरात मंदार किवळे याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपीला गुरुवारी अटक केली. प्रथमेश दीपक येनपुरे (वय १९, रा. कात्रज; मूळ रा. पाबे) असे त्याचे नाव असून, त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. पंजवानी यांनी त्याला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

येनपुरे हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून, त्याने कट रचून हा हल्ला केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गुन्हा करताना त्याने वापरलेले कपडे, कोयते आणि दुचाकी जप्त करायची आहे. तसेच, या हल्ल्यासाठी कोणी आर्थिक रसद पुरविली आणि शस्त्रे कोठून मिळविली, याचा तपास करायचा असून गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. या घटनेतील फिर्यादी गंभीर जखमी असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. न्यायालय परिसरात शस्त्रांसह येऊन प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत आरोपींची मजल जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. 

पुणे कोर्ट हल्ला प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी अन् ८ आरोपी गजाआड

Q

पुण्यात संशयित बॅग कुठे आढळली होती?

A

पुण्यातील कॅम्प परिसरातील १५ ऑगस्ट चौकात एका बँकेबाहेर संशयित बॅग आढळली होती. त्यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

Q

पुण्यात आढळलेल्या संशयित बॅगेच्या तपासणीत काय निष्पन्न झाले?

A

संशयित बॅगेची बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून तपासणी करण्यात आली. मात्र, या बॅगेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Pune Crime News
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी अन् ८ आरोपी गजाआड