Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेक फेल झालेल्या ट्रकची क्रेनला धडक अन्…; पुण्याच्या नवले पुल भागातील दुर्दैवी घटना

पुण्यात अपघाताचे सत्र सुरुचं असून, पुण्यातील भागात अपघाताच्या घटना घडत आहेत. पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज घाट परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2024 | 09:28 PM
ब्रेक फेल झालेल्या ट्रकची क्रेनला धडक अन्...; पुण्याच्या नवले पुल भागातील दुर्दैवी घटना

ब्रेक फेल झालेल्या ट्रकची क्रेनला धडक अन्...; पुण्याच्या नवले पुल भागातील दुर्दैवी घटना

Follow Us
Follow Us:
पुणे: नवले पूल परिसरात सेवा रस्त्यावर उभा असलेल्या क्रेनला ब्रेक फेल झालेल्या भरधाव ट्रकने धडक दिली. या घटनेत ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी घडली असून,  ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ही घटना घडली. दरम्यान, चालकाने प्रसंगावधान राखत गाडी मूख्य रस्त्यावरून सेवा रस्त्यावर नेल्याने होणारी दुर्घटना टळली. सलीम मकबूल शेख (वय ५८, रा. उमगरा) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर अपघातात समीर आयुब मोमीन हे जखमी झाले आहेत. पुण्याकडे येणारा नवले ब्रिजवर सतत अपघात होताना दिसून येत आहेत. वाहतूक प्रशासन सातत्याने अपघात रोखण्यासाठी प्रयत्न देखील करत आहेत.
मिळालेल्या माहितीनूसार, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास कात्रजहून नवले पूलाच्या दिशेने जात असलेल्या ट्रकचा ब्रेक निकामी झाला. ही बाब चालकाच्या लक्षात आल्याने त्याने ट्रक मूख्य रस्त्यावरून सेवा रस्त्यावर घेतली. वेगात असलेल्या ट्रकची सेवा रस्त्यावर उभा असलेल्या क्रेनला जोरात धडक बसली. या अपघातात ट्रक केबिनचा चक्काचूर झाला. यात चालक शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर, क्लिनर समीर हे आतमध्ये अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच नवले अग्निशामक केंद्र, सिंहगड अग्निशामक केंद्र, पीएमआरडीए अग्निशामक केंद्राच्या चार गाड्या घटनास्थळी पोहचल्या. काही वेळात जवानांनी केबिनमधून जखमी समीरला बाहेर काढले. समीर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर काही वेळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, काही वेळात वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उतरून कोंडी फोडण्याचे काम केले. सिंहगड रोड पुढील तपास करत आहेत.कात्रज घाटात भीषण अपघात

पुण्यात अपघाताचे सत्र सुरुचं असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागात दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज घाट परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. विक्रम विठ्ठल मोरे (वय ४८, रा. सुमती बालवन शाळेजवळ, गुजरवाडी, कात्रज) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

हेही वाचा: कात्रज घाटात भीषण अपघात; टेम्पोची दुचाकीला धडक बसली अन्…

अपघातात सहप्रवासी स्वप्नील लोहकरे (वय ३१) जखमी झाले आहेत. याप्रकरणी टेम्पोचालक सुमीत शेनवेकर (वय ३५, रा. महागाव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मोरे यांचा मुलगा रोहित (वय २२) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.दुचाकीस्वार विक्रम आणि स्वप्नील शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास कात्रज घाटातील भिलारेवाडी परिसरातून निघाले होते. त्यावेळी भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार विक्रम व स्वप्नील जखमी झाले. विक्रम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख अधिक तपास करत आहेत.

Web Title: The brake fail truck hit the crane then driver loss their life at navale bridge pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 09:26 PM

Topics:  

  • Navale bridge Accident
  • Pune
  • Pune Accident

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.