Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC पेपर विक्री प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना अटक, मध्यप्रदेश कनेक्शनही उघड

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी त्यांनी तब्बल 40  लाख रुपयांची मागणी केली होती. या संदर्भातील फोन कॉलमुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 03, 2025 | 10:26 AM
MPSC पेपर विक्री प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना अटक, मध्यप्रदेश कनेक्शनही उघड
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: एमपीएससी पेपर विक्री प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आणखी दोन जणांना अटक केली आहे. यातील एकाला महाराष्ट्रातून, तर दुसऱ्याला मध्य प्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले. यापूर्वीच पोलिसांनी तिघांना अटक केली होती, त्यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

या टोळीने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधल्या रात्री प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी त्यांनी तब्बल 40  लाख रुपयांची मागणी केली होती. या संदर्भातील फोन कॉलमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Delhi Assembly Election: निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षाला झटका; ‘त्या’ आठ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) रविवारी ( २ फेब्रुवारी) घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परिक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ४० लाखांची मागणीचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात दोघांना अटक केली आहे. योगेश सुरेंद्र वाघमारेला (२७ वर्षे) याला  भंडारा जिल्ह्यातून तर दीपक यशवंत साकरेला (२७ वर्षे) याला मध्यप्रदेशातील बालाघाटमधून अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींनी परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवण्याचे आमिष दाखवले होते.

योगेश आणि दीपक यांनी परीक्षेपुर्वी काही विद्यार्थ्यांना फोन  करून प्रश्नपत्रिका पुरवण्याचे आमिष दिले होते. या फोनची कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासाअंती  आरोपींनी फोन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत या दोघांना अटक केली आहे.

National Women Doctors Day : ‘हा’ खास दिवस साजरा करण्याचा उद्देश्य म्हणजे महिलां

विद्यार्थ्यांना आलेल्या फोनकॉलवरील संभाषण?

 एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आलेल्या फोन कॉलमध्ये असे सांगण्यात आले की, “नमस्कार सर, मी रोहन कन्सल्टन्सी, नागपूरमधून बोलत आहे. आपल्या आधीच्या चर्चेनुसार महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ. त्यासाठी आपण व्हॉट्सअप कॉलद्वारे एक मिटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे पुढील प्रक्रिया होईल.” ही कॉल एका महिलेच्या आवाजात होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच प्रश्नपत्रिका मिळू शकते, या दाव्याने एमपीएससी परीक्षार्थींमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती.

रविवारी ( २ फेब्रुवारी) एमपीएससी गट ब (अराजपत्रीत) संयुक्त पुर्व परिक्षा सुरळीत पार पडली. मात्र, दोन दिवसांपासून या परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसह दिली जाईल. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील, असे कॉल रेकॉर्डींग सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुण्यातील एका विद्यार्थ्यालाही फोन आला होता. तसेच एमपीएससी आयोगाकडेही काही विद्यार्थ्यांनी यासंदंर्भात ईमेलव्दारे तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयोगाने पुणे पोलिसांना तक्रार केली होती. पोलीस आयुक्त अमितेशकुमार व गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांनी गांर्भियाने दखल घेत तपासाच्या सूचना केल्या होत्या.

 

Web Title: Three arrested in mpsc paper sale case madhya pradesh connection also revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 09:37 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.