Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत टोरेस कंपनीचा महाघोटाळा; दादरमध्ये आउटलेट उघडलं, गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधींची फसवणूक

कंपनीचे मीरा-भाईंदरचे आऊटलेट सोमवारी अचानक बंद झाल्याने दुकानाबाहेर गुंतवणूकदारांची गर्दी झाली होती. यासंदर्भात कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीशी संपर्क होऊ शकला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 07, 2025 | 09:09 AM
टोरेसचा सीईओ अटकेत; ३ पर्यंत पोलिस कोठडी

टोरेसचा सीईओ अटकेत; ३ पर्यंत पोलिस कोठडी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईच्या मीरा-भाईंदरमधील टोरेस नावाच्या एका कंपनीत महाघोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये गुंतवणूक योजनेत हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकल्याची बाब समोर आली आहे. टोरेस ज्वेलरी कंपनीवर हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाल्याचा आरोप आहे.

कंपनीचे मीरा-भाईंदरचे आऊटलेट सोमवारी अचानक बंद झाल्याने दुकानाबाहेर गुंतवणूकदारांची गर्दी झाली होती. यासंदर्भात कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीशी संपर्क होऊ शकला नाही. कंपनीशी संबंधित एका महिलेने सांगितले की, वेबसाईटमधील तांत्रिक अडचणींमुळे गुंतवणूकदारांचे परतावे त्यांना पाठवले जात नाही. 2023 मध्ये नोंदणीकृत ‘प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने 2024 मध्ये ‘टोरेस’ ब्रँड अंतर्गत दादरमध्ये 30 हजार स्क्वेअर फुटांचे आउटलेट उघडले. यानंतर कंपनीने मीरा-भाईंदरसह इतर ठिकाणी आऊटलेट्स उघडले.

कंपनीने सोने, चांदी आणि मॉइसॅनाइट दगड (लॅबने तयार केलेले हिरे) खरेदीवर त्याच रकमेवर अनुक्रमे 48, 96 आणि 520% ​​वार्षिक परतावा देण्याचे वचन दिले. रिटर्न साप्ताहिक भरले जात होते. दोन आठवडे परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कोट्यवधी रुपये बुडाण्याची शक्यता

या योजनेबाबत काही आठवड्यांपूर्वी पोलिस प्रशासनाकडे तक्रार केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अलीकडेच एकाने मित्राच्या सांगण्यावरून 6 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याच्या मित्रानेही नऊ लाख रुपये गुंतवले होते. त्याला दर आठवड्याला 48 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, पण दोन आठवडे पैसे आले नाहीत. त्यामुळे गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

काही महिन्यांपूर्वीच कंपनीची स्थापना

काही महिन्यांपूर्वी या ज्वेलरी कंपनीची दादरमध्ये स्थापना झाली. पैसे दामदुप्पट करून देण्याच्या स्कीम आखल्या होत्या. यामध्ये लोकं हळूहळू समाविष्ट झाले. तुमचे पैसे एक आठवड्यात 7 टक्क्यांनी वाढतील अशी हमी होती. लोकांना 2 महिने 7 टक्क्यांनी पैसे मिळत होते आणि ही टीम इतकी हुशार होती की ॲपद्वारे तुम्ही टाकलेले पैसे हे कधी मॅच्युअर होणार आणि किती होणार हे लोकं कधीही पाहू शकतं होते.

Web Title: Torres company huge scam in mumbai nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 09:09 AM

Topics:  

  • Torres Company

संबंधित बातम्या

टोरेस घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट; म्होरक्या गेला युक्रेनमध्ये, आता पुढं काय? तर…
1

टोरेस घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट; म्होरक्या गेला युक्रेनमध्ये, आता पुढं काय? तर…

Torres Scam : ४.२५ कोटी गुंतवणूक, अपहार १७७ कोटींचा; टोरेसप्रकरणी आरोपपत्र दाखल
2

Torres Scam : ४.२५ कोटी गुंतवणूक, अपहार १७७ कोटींचा; टोरेसप्रकरणी आरोपपत्र दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.