टोरेस घोटाळ्यात परदेशी नागरिकांचा हात असल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी जानेवारी २०२५ मध्ये केला होता. या टोळीचा म्होरक्या इगोर युर्चेन्कोव्ह हा आरोपी युक्रेनमध्ये सापडला.
टोरेस गैरव्यवहारात राज्यातील १४ हजार १५७ गुंतवणूकदारांची फसवणूक करून १७७ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या फरार युक्रेनियन आरोपींनी यासाठी चार कोटी ३५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचं तपासात उघड झालं आहे.
पैसे गुंतवल्यावर बाजारभावापेक्षा जास्तीचा परतावा मिळेल असं आमीष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाची पोलिसांकडून सखोल तपासणी केली जात आहे.
सध्या देशभरात टोरेस कंपनीचा स्कॅम चर्चेत आहे. याच कंपनीत आता दादरच्या एका भाजी विक्रेत्याने गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक एक दोन लाखाची नाही तर तब्बल 4 कोटी रुपयांची होती.
कंपनीचे मीरा-भाईंदरचे आऊटलेट सोमवारी अचानक बंद झाल्याने दुकानाबाहेर गुंतवणूकदारांची गर्दी झाली होती. यासंदर्भात कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीशी संपर्क होऊ शकला नाही.