पंढरपूर तालुक्यातील वाळूमाफियावर पोलिसांची मोठी कारवाई; गुन्हा दाखल करून थेट तुरुंगात पाठवलं
अंबाजोगाई : तालुक्यातील सहा वर्षीय अल्पवयीन मुलीस शेजारीच राहणाऱ्या नराधमाने चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोर्टात हजर केले असता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जे. घरत यांनी वीस वर्षांची सक्तमजुरी व अकरा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील अल्पवयीन मुलीस चॉकेलटचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या विष्णु बाबुराव सादुळे याने घरात बोलवून २३ मार्च २०२३ रोजी तिच्यावर अत्याचार केला. यानंतर ही अल्पवयीन मुलगी घरी जाऊन एकटीच बसली होती. कोणासही बोलत नव्हती. तिने पोट दुखत असल्याचे सांगितले. त्यामुळे पालकांनी तिला काय झाले तू बोलत का नाहीस, पोट कशाने दुखत आहे, असे विचारले असता तिने घडलेला प्रकार सविस्तर सांगितला.
विद्यार्थिनींचा मोर्चा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती. घटना ही निंदनीय असून, शहरातील सर्व शाळांच्या मुलींनी हजारोंच्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान विद्यार्थिनींनी नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. या मोर्चाची देखील न्यायालयाने गंभीर दखल घेतली.
शाळेतील सेवकाचे चौथीतील विद्यार्थ्यासोबत अश्लिल कृत्य
दुसऱ्या एका घटनेत, नांदेडमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली होती. शाळेत सेवकाने चौथीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. शहरातील प्रसिद्ध ज्ञानमाता विद्या विहार शाळेत गुरुवारी (6 मार्च) दुपारी प्रकार घडला आहे. पीडित विद्यार्थ्यांने या घटनेची माहिती आपल्या आई वडिलांना दिली. त्यानंतर त्याच्या पालकांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीचे नाव सबसिंग मच्छल (वय ५०) आहे.