
crime (फोटो सौजन्य: social media)
जमिनीतून एका हाताचा भाग दिसून आला
मृत मुलगी साक्षी यादव (वय 17) ही प्रयागराजच्या लखराव गावातील रहिवासी होती. तर आरोपीचे नाव हर्षवर्धन सिंह असून तो सैन्यदलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच श्वानपथकाला मदतीसाठी बोलावले. श्वानांनी माती उकरण्याचा प्रयत्न केल्यानंतर जमिनीतून एका हाताचा भाग दिसून आला आणि त्यानंतर हा खून असल्याचे स्पष्ट झाले. त्या ठिकाणी साक्षीची बॅग आणि इतर काही वस्तू छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या होत्या. पोलिसांनी त्या वस्तू ताब्यात घेतल्या असता बॅगेवर आरोपी हर्षवर्धनचे नाव आढळले, ज्यामुळे तपास अधिक गतीने पुढे नेण्यात आला.
हर्षवर्धनला अटक
पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात साक्षी ही हर्षवर्धनच्या मोटारसायकलवर बसून त्या भागात जाताना दिसली. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित हर्षवर्धनला अटक केली. चौकशीदरम्यान हर्षवर्धनने गुन्ह्याची कबुली दिली.
विवाह ठरल्याने साक्षीने त्याला विरोध केला
हर्षवर्धन आणि साक्षी एकमेकांना बराच काळ ओळखत होते. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. मात्र अलीकडेच हर्षवर्धनचा विवाह ठरल्याने साक्षीने त्याला विरोध केला. त्यांच्यातील वाद वाढू लागल्याने हर्षवर्धनने १० नोव्हेंबर रोजी साक्षीला भेटायला बोलावले. मोटारसायकलवर बसवून तिला बागेत नेले आणि तिथे तिची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्याने मृतदेह मातीखाली पुरला.
तपास सुरु
घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीवर झालेला हा अत्याचार समाजाला हादरवून सोडणारा आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.
Ans: प्रयागराज
Ans: साक्षी
Ans: सेना