वाल्मिक कराडचा आणखी एक क्रूर चेहरा उघड; मुंडे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शीचाही खून
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची देण्यात आली आहे. आज (22 जानेवारी), बीड न्यायालयाने खंडणी आणि मकोका प्रकरणी वाल्मिक कराडला 14 दिवसांची कोठडी दिली. या प्रकरणी आद सीआयडीने न्यायालयात सुनावणी पार पडली. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे.
त्यानंतर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीत मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांवर न्यायालयाने निर्णय घेतला. त्याचबरोबर, वाल्मिक कराड जामिनासाठी प्रयत्न करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, मकोका लागू झाल्यामुळे तात्काळ जामीन मिळणे कठीण असल्याचे मानले जात आहे.
अभिनेता स्वप्नील जोशीने भूमिकांमधील वैविध्य जपत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले!
31 डिसेंबरला वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले. पुणे पोलिसांनी वाल्मिक कराडला बीड पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतरही वाल्मिक कराडच्या समर्थकांनी त्याच्या सुटकेसाठी निदर्शनेही केली. पण संतोष देशमुखांच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनापुढे सर्मथक टिकू शकले नाही. खंडणी प्रकरणात कराडला सीआयडी कोठडीत पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत खंडणी प्रकरणात कराडला जामीन मंजूर करण्यात आला. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. खरंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला जामीन मिळणे सोपे असते. पण वाल्मिक कराडवर आता मकोका गुन्हाही दाखल झाल्यामुळे त्याला आता जामीन मिळणे अवघड मानले जात आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी 29 नोव्हेंबरचे काही सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. यात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांच्यासह त्यांचे काही साथीदार सोबत दिसत आहेत. केज शहरात असलेल्या विष्णू चाटे याच्या कार्यालयात वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता. त्यावेळेचे हे फुटेज व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटीलसुद्धा या व्हिडीओत वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. त्यामुळे कराडशी संबंधिच असलेल्या खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याची चर्चा आहे.
Garth Hudson: द बँडचे सदस्य आणि प्रमुख वादक गार्थ हडसन यांनी ८७ व्या वर्षी घेतला