मुंबई: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांनाही आज अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना पुढील तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे ताब्यात घेतल्यानंतर या प्रकऱणात अनेक गोष्टी समोर येतील, अशी चर्चा होती. त्यानंतर आता त्यांना या प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले आहे. घुले आणि सांगळेच्या अटकेवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.
संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर भाजप नेते सुरेश धस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. आता घुले आणि सांगळे यांना अटक केल्यानंतरही सुरेश धस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. अटक केलेले फक्त प्यादे आहेत, पण त्यांचा मुख्य आरोपी आका असल्याचे सुरेश धस यांनी म्हटलं आहे. आज पकडलेले आरोपी हे फक्त प्यादे आहेत, पण मुख्य आरोपी आका आहे, असं मी म्हणालो होतो. ‘बकरे की अम्मा कब तक दुवा मागेगी.’ असही त्यांनी म्हटलं आहे. तसेच, देशमुख हत्या प्रकरणाट चालू असलेल्या चौकशीत आपण समाधानी असल्याचेही सुरेश धस म्हटलं आहे.
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, आरोपीला अटक करण्यासाठी 26 दिवसांचा कालावधी का लागला, त्यामागचा मास्टरमाईंड वाल्मीक कराड असल्याचे आम्ही पहिल्यापासून बोलत होतो. मग त्याला अटक झाल्यानंतरही 302 चा गुन्हा का दाखल झाला नाही, आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल असतानाही त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले जाते, सरेंडर कधी व्हायचे तेही तोच ठरवलो, त्यांना पुरावे नष्ट करण्यासाी वेळ दिला जातो. पण
डीआरमध्ये ज्याचे नाव ते पोलीस प्रशासनाला मी देणार आहे. याशिवाय धनंजय मुंडेंनीही नैतिकता दाखवून या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत राजीनामा द्यावा. सीआयडीनेच या प्रकरणातील मुख्य जनतेसमोर आणावे, असे संदीप क्षीरसागर म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही गंभीर आरोप केले आहेत. हत्येनंतर आरोपी फरार झाले, त्यानंतरही गुन्हाही उशिराने दाखल करून घेण्यात आला, यामुळे पोलिसांच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. अशा घटनांमुळे महाराष्ट्र पोलिसांचाच नावलौकिक कमी होऊ लागला आहे आणि हे फार दु्र्दैवी आहे. आरोपींची माहिती असतानाही वेळकाढूपणा करण्यात आला, असा आरोप वड्डेटीवार यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षातील लोकं प्रयत्न करत आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण पोलिसांनीही कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
लढाऊ विमाने, तोफगोळे, क्षेपणास्त्रे… अमेरिका करणार इस्रायलशी 8 अब्ज डॉलर्सचा करार
खासदार सुप्रिया सुळे यांनी या अटकेवर भाष्य केलं आहे. आरोपींना उशिरा का होईना अटक झाली, पण पुण्यातून अटक कशी होते? पोलिस यंत्रणांनी याबाबत एक ऑफिशियल स्टेटमेंट काढले पाहिजे. दिल्लीतही या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.अनेकजण विचारत आहेत. महाराष्ट्र सरकारने एक ऑफिशियल स्टेटमेंट काढलचं पाहिजे. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे परभणी आणि बीड प्रकरणात न्याय दिला पाहिजे. असा संवेदनशीलपणा मुख्यमंत्र्यांनी दाखवला पाहिदे आणि राजकारण बाजूला ठेवून कारवाई केवी पाहिजे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.