Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indrajeet Sawant: कोरटकरला परदेशात पळून जाण्यात मदत कुणी केली..? इंद्रजीत सावंतांचा संतप्त सवाल

प्रशांत कोरटकरला वाचवणाऱ्या शक्तींना उघड करण्याची गरज आहे. जर कोरटकरला कोणी पाठीशी घालत असेल, तर त्यांचा बुरखा फाडला पाहिजे. हे फक्त पोलिसांचे नाही, तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचेही काम आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 22, 2025 | 01:09 PM
Indrajeet Sawant: कोरटकरला परदेशात पळून जाण्यात मदत कुणी केली..? इंद्रजीत सावंतांचा संतप्त सवाल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणारा दुबईला पळून जातो, हे राज्याच्या गृहखात्याचं अपयश आहे. प्रशांत कोरटकरने अशी वक्तव्ये करून एक महिना उलटून गेला तरी त्याला पकडण्यात आले नाही. आता तो दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरू आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्या चिल्लर माणसाला मदत करणाऱ्यांचा बुरखा खेचून काडला पाहिजे, अशा शब्दांत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणार आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत याना धमक्या देणार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून इंद्रजीत सावंत यांनी राज्य सरकार आणि गहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.मी कोल्हापूरमध्ये राहतो, माझा आणि त्या कोरटकरचा आयुष्यात कधीच संबंध आला नाही. मग माझा फोन नंबर त्याला कोणी दिला ? असा सवाल  सावंत यांनी उपस्थित केला आहे.

Prashant Koratkar update: प्रशांत कोरटकर दुबईला फरार? पोलिसांवरच संशयाची सुई

यावेळी बोलताना इंद्रजीत सावंत म्हणाले की, प्रशांत कोरटकर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही, यामुळे संशयाची साखळी अधिकच वाढत आहे. त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा, जेणेकरून तो देशाबाहेर पलायन करू शकणार नाही. इतक्या दिवसांपासून शोधमोहीम सुरू असूनही त्याचा थांगपत्ता न लागल्याने, कोणीतरी त्याला पाठीशी घालत आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, इंद्रजीत सावंत यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, कोरटकरला कोणत्या ना कोणत्या यंत्रणेचे संरक्षण मिळत आहे, अशी स्पष्ट शंका व्यक्त केली आहे.

“कोणीतरी जाणीवपूर्वक प्रशांत कोरटकरला वाचवत आहे, म्हणूनच त्याला आत्तापर्यंत अटक होत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरण अधिक गांभीर्याने घेतले पाहिजे आणि त्याच्या अटकेसाठी प्रभावी पावले उचलली पाहिजेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती शोधून काढल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.

Car Price Hike : महागाईचा ग्राहकांना मोठा धक्का! ‘या’८ कंपन्यांनी वाढवल्या कारच्या किंमती, खरेदी करण्यापूर्वी वाचा

प्रशांत कोरटकरला वाचवणाऱ्या शक्तींना उघड करण्याची गरज आहे. जर कोरटकरला कोणी पाठीशी घालत असेल, तर त्यांचा बुरखा फाडला पाहिजे. हे फक्त पोलिसांचे नाही, तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचेही काम आहे,” असेही सावंत यांनी म्हटले आहे. तसेच. प्रशांत कोरटकर परदेशात पळून जाऊ नये, म्हणून त्याचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी सावंत यांनी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी अधिक ठामपणे मांडली आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणावर आता सरकार काय भूमिका घेते आणि कोरटकरला मदत करणाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. जर तो देशाबाहेर गेला असेल, तर त्याला परत आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, याबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Who helped koratkar escape abroad indrajit sawants angry question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • Mahayuti Government

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana july installment : लाडक्या बहिणींना कधी मिळणार जुलैचा हप्ता; रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर तरी होणार का धनलाभ?
1

Ladki Bahin Yojana july installment : लाडक्या बहिणींना कधी मिळणार जुलैचा हप्ता; रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर तरी होणार का धनलाभ?

महिला बचत गटांसाठी उमेद मॉल, विशेष न्यायालये अन्…; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय
2

महिला बचत गटांसाठी उमेद मॉल, विशेष न्यायालये अन्…; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

Sanjay Raut News: अमित शाहांच्या हाती महायुतीचा रिमोट कंट्रोल…; राऊतांनी फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळलं
3

Sanjay Raut News: अमित शाहांच्या हाती महायुतीचा रिमोट कंट्रोल…; राऊतांनी फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळलं

जलजीवन बनतंय कंत्राटदारांसाठी जीवघेणे; सरकारच्या थकबाकीचा आकडा वाचून बसेल धक्का
4

जलजीवन बनतंय कंत्राटदारांसाठी जीवघेणे; सरकारच्या थकबाकीचा आकडा वाचून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.