एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार
अमरावती : लोकर शिवण्याचे काम शिकणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 22) नांदगावपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलाम अंसारी (29, रा. ह.मु. प्रवीणनगर, अमरावती) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
हेदेखील वाचा : सोशल मीडियावर मैत्री नंतर प्रियकराला भेटण्यासाठी ट्रेनमध्ये चढली अन्…, मुलीवर सामूहिक अत्याचार
पीडित महिला ही ड्रिमलँड मार्केटमधील एका दुकानात लोकर शिवण्याचे काम गुलाम अन्सारीकडून शिकत होती. दरम्यान, 6 ऑगस्ट 2024 रोजी ड्रीमलॅन्डमध्ये धाड पडणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे आरोपीने कारखान्याचे शेटर बंद केले आणि महिलेशी अश्लिल वर्तन सुरु केले. त्यामुळे तिने आरडाओरड केली असता जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर रविवारपासून (दि. 19) पुन्हा पाच दिवस आरोपीने महिलेला धमकावून अत्याचार केला.
यादरम्यान तिला कुरबान नामक तरुणाचा कॉल आला. त्यावेळी पतीने महिलेला कुणाचा कॉल आला अशी विचारणा केली असता महिलेने अत्याचाराचे कथन पतीसमोर केल्याने बदनामी होऊ नये, म्हणून महिला स्वतः तक्रारीसाठी पुढे आली नव्हती. परंतु, शेवटी असह्य होत पीडितीने बुधवारी नांदगावपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना बेनोडा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी निखिल दीपक सलामे (34, रा. वरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बिहारमध्ये तरूणीवर सामूहिक अत्याचार
बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील नवीनगरमध्ये प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सामूहिक अत्याचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. ही घटना १९ जानेवारी रोजी सकाळी घडली. पीडित मुलगी कैमूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. सोशल मीडियावर तिची औरंगाबाद जिल्ह्यातील एका तरुणाशी मैत्री झाली. तिने ट्रेन पकडली आणि त्याला भेटण्यासाठी नवीनगरला पोहोचली. नवीनगरचे एसएचओ मनोज कुमार पांडे यांनी सोमवारी सांगितले.
पुण्याच्या पर्वती भागातही अत्याचाराची घटना
इन्स्टावर ओळख आणि ओळखीतून निर्माण झालेले प्रेम… प्रेमाची कहाणी पुढे सरकल्यानंतर मात्र, प्रियकराने तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. त्याचे फोटो व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला मित्रासोबतही संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात १८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.