महाविकास आघाडी एकसंघपणे लढणार; इचलकरंजी महानगरपालिकेत भक्कम पर्याय देणार
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी मतदानही झाले. त्यानंतर आता या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज (दि.८) घेतली जाणार आहे. सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारी बारा वाजेपर्यंत जवळपास सर्व चित्र स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मतदानानंतर सर्व मतदान यंत्र 70 वेगवेगळ्या स्ट्रॉंग रुममध्ये ठेवण्यात आले आहे. या ईव्हीएमवर 24 तास सीसीटीव्हीची नजर आहे.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाले होते. मतदानानंतर आम आमदी पार्टी आणि भाजपनेही विजयाचा दावा केला आहे. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज भाजपच्या बाजून गेले आहेत. दिल्ली विधानसभेचा निकाल निवडणूक आयोगाच्या https://www.eci.gov.in/ या अधिकृत वेबसाईडवर पाहता येणार आहे. प्रत्येक मतदारसंघाचा निकाल तुम्ही या वेबसाईटवर पाहू शकता. शिवाय कुणाला किती आघाडी मिळाली आहे याची माहितीही या वेबसाईटवर मिळणार आहे. मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
याशिवाय ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत, त्या ठिकाणीही तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन लेअरमध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आर. एलिस वाज यांनी सांगितले आहे. ईव्हीएमवर 24 तास सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली आहे. उमेदवार आणि त्यांचे निवडणूक एजंट यांना अडचण येणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. ज्यावेळी स्टाँग रूम उघडले जातील, त्यावेळी व्हिडीओग्राफी केली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दुपारी 12 वाजेपर्यंत चित्र होईल स्पष्ट
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व 70 जागांसाठी शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. येत्या पाच वर्षांत दिल्ली कोणाच्या ताब्यात राहणार हे चित्र दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होऊ शकते. बहुतांश एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाची पिछेहाट झाल्याचे दिसून आले असून, भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल मानल्या जाणाऱ्या सुमारे 22 जागांवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे लक्ष लागले आहे. यापैकी सीलमपूर, मुस्तफाबाद, मतिया महल, बल्लीमारन आणि ओखला या जागांवर मुस्लिम उमेदवार अनेकदा निवडणूक जिंकत आले आहेत. याशिवाय बाबरपूर, गांधीनगर, सीमापुरी, चांदनी चौक, सदर बाजार, किरारी, जंगपुरा आणि करावल नगर अशा 18 जागा आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या 10 ते 40 टक्के मानली जाते. या भागात मुस्लिम समाजाचे मतदार निर्णायक भूमिका बजावत आहेत.