सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी टर्म २ परीक्षेसाठी आवश्यक सूचना जारी केल्या आहेत. २६ एप्रिल २०२२ पासून सुरू होणाऱ्या या परीक्षेला यंदा दहावी आणि बारावीचे ३४ लाख विद्यार्थी बसणार आहेत. बोर्डाने सर्व सीबीएसई संलग्न शाळांना नव्या गाईडलाईन्स पाठवल्या आहेत. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे बोर्डाने कोव्हिड-१९ बाबत घेतलेली कठोरताही आता कमी केली आहे, त्यामुळे बोर्डाच्या नव्या गाईडलाईन्स कोव्हिड-१९ बद्दल आहेत.
[read_also content=”मुंबई बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-high-court-gave-bail-to-pravin-darekar-nrsr-267887.html”]
सीबीएसई बोर्ड लवकरच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच प्रवेशपत्र आणि रोल नंबर जारी करणार आहे. या आठवड्यात दहावी आणि बारावी परीक्षांचे रोल नंबर आणि प्रवेशपत्रके सीबीएसई संलग्न शाळांना पाठवली जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये त्याचे वाटप केले जाईल. तर खाजगी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जारी केले जातील.
सीबीएसई टर्म २ बोर्ड परीक्षेसाठी नव्या गाईडलाईन्स