Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

८४ वर्षांच्या शरद पवारांची पुन्हा भर पावसात सभा; इचलकरंजीत २०१९ च्या त्या सभेची पुनरावृत्ती

सध्या विधासभा निवडणुकीचा प्रचारही अंतिम टप्प्यात असून शरद पवार यांची इंचलकरंजीत आज सभा पार पलडी. या सभेतही पावसाने हजेरी लावली. यावेळी शरद पवार थांबले नाहीत.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 15, 2024 | 03:55 PM
८४ वर्षांच्या शरद पवारांची पुन्हा भर पावसात सभा; इचलकरंजीत २०१९ च्या त्या सभेची पुनरावृत्ती

८४ वर्षांच्या शरद पवारांची पुन्हा भर पावसात सभा; इचलकरंजीत २०१९ च्या त्या सभेची पुनरावृत्ती

Follow Us
Close
Follow Us:

2019 मध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची जाहीर सभा झाली होती. शरद पवार यांचं भाषण सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली मात्र शरद पवार यांनी भाषण थांबवलं नाही. समोर उपस्थित लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन संपूर्ण भाषण ऐकलं. या सभेच संपूर्ण देशभर चर्चा झाली आणि भाजपचे उमदेवार उदयनराजे भोसले यांचा दारूण पराभव झाला. सध्या विधासभा निवडणुकीचा प्रचारही अंतिम टप्प्यात असून शरद पवार यांची इंचलकरंजीत आज सभा पार पलडी. या सभेतही पावसाने हजेरी लावली. यावेळी शरद पवार थांबले नाहीत. भर पावसातही त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं.

शरद पवार यांच्यासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये आज सभा पार पडली. महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या सभेसाठी शरद पवार इचलकरंजीमध्ये पोहोचले. सांगलीमधील रोहित पाटील यांच्यासाठी सभा पार पडल्यानंतर इचलकरंजीमध्ये शरद पवार मनद कारंडे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान पाऊस आणि शरद पवार यांचं समीकरण पुन्हा एकदा जुळून आलं. नेमका हाच धागा पकडत शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.

सभा आणि पावसाचं समीकरण जुळलं की निकाल चांगला लागतो

यावेळी बोलताना पावसावरून जोरदार फटकेबाजी केली. समोर उपस्थित लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्रामध्ये अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो, असं शरद पवारांनी जाहीर सभेत बोलताच समोरुन एकच जल्लोष झाला. यावेळी समोर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जोरदार प्रतिसाद देत शरद पवार यांच्या सभेत भर पावसातही जाण आणली. या सभेचीही राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

निवडणुकीसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्याचा निर्णय आता तुम्ही घ्या

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे आपण कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचं आहे. सत्तेत बदल केल्याशिवाय पर्याय आपल्यासमोर दिसत नाही आणि सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, यापेक्षा इथे अधिक बोलावसं वाटत नाही. ही विधानसभेची निवडणूक आहे. महाराष्ट्राचा पाळणा कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे अनुभव काही चांगला नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

2019 मध्येही सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची जाहीर सभा झाली होती. शरद पवार यांचं भाषण सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली मात्र शरद पवार यांनी भाषण थांबवलं नाही. समोर उपस्थित लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन संपूर्ण भाषण ऐकलं. या सभेची संपूर्ण देशभर चर्चा झाली आणि भाजपचे उमदेवार उदयनराजे भोसले यांचा दारूण पराभव झाला होता.

Web Title: 84 year old sharad pawar again campaign rally in rain in ichalkaranji after 2019 satara rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 03:15 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • sharad pawar news

संबंधित बातम्या

Amol Mitkari News: पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत…; अमोल मिटकरींचे सूचक विधान
1

Amol Mitkari News: पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत…; अमोल मिटकरींचे सूचक विधान

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
2

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.