काश्मीरमध्ये आम आदमी पार्टीचे खाते उघडले, मेहराज मलिक 4000 मतांनी विजयी (फोटो सौजन्य-X)
जम्मू आणि काश्मीरमधील डोडा विधानसभा मतदारसंघ उधमपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. य सीमांकनानंतर डोडा विधानसभा मतदारसंघ दोन जागांमध्ये विभागला गेला आहे. त्यापैकी एक म्हणजे डोडा आणि दुसरा दोडा पश्चिम आहे. येथे डोडा भाग मुस्लिमबहुल आहे तर डोडा पश्चिम हा हिंदूबहुल जागा आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने डोडा मतदारसंघात विजय मिळवला होता. यावेळीही पक्षाने उमेदवार बदलला नसून गजयसिंह राणा यांना तिकीट दिले आहे. याचदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये आम आदमी पार्टीचे खाते उघडण्यात आले आहे. आम आदमी पक्षाने डोडा विधानसभेची जागा जिंकली आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांनी भाजपचे उमेदवार गजयसिंह राणा यांचा सुमारे चार हजार मतांनी पराभव केला.
हे सुद्धा वाचा: हरयाणा निवडणूक निकाल; विनेश फोगाटला टक्कर, सावित्री जिंदल आघाडीवर
काँग्रेसने दोडामधून शेख रियाज यांना नॅशनल कॉन्फरन्सने खालिद नजीब सुहारवाडी तर आम आदमी पार्टीने मेहराज मलिक, पीडीपीने मन्सूर अहमद भट यांना तिकीट दिले आहे. या जागेवर 9 उमेदवार रिंगणात आहेत. येथे पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यात युती आहे आणि ते इंडिया अलायन्स अंतर्गत निवडणूक लढवत आहेत. परंतु दोडा जागेवर त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे, जेणेकरून भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करता येईल.
मतमोजणीच्या सातव्या फेरीत दोडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरू आहे. भाजपचे गजयसिंह शर्मा दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत. मेहराज मलिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या जागेवर मतमोजणीच्या सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. तर दुसरीकडे दोडा विधानसभेच्या जागेवर पुन्हा उलथापालथ होताना दिसत आहे. येथे भाजपचे गजयसिंह राणा आघाडीवर आहेत. ते आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांच्यापेक्षा १२०३ मतांनी पुढे आहेत.
जम्मू-काश्मीरच्या डोडा विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू आहे. येथे मोठी उलथापालथ होताना दिसते. डोडा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक आघाडीवर आहेत. डीपीएपीचे अब्दुल मजीद वाणी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जम्मू-काश्मीरच्या डोडा विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू आहे. येथून भाजपचे गजयसिंह राणा आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार शेख रियाझ यांनी आपली राजकीय कारकीर्द सरपंच म्हणून सुरू केली आणि विकार वाणी काँग्रेसचे अध्यक्ष असताना जम्मू-काश्मीर काँग्रेसचे सरचिटणीस होते. त्यांच्या पत्नी जिल्हा विकास परिषदेच्या सदस्य आहेत.
हे सुद्धा वाचा: जम्मू-काश्मीरमध्ये सर्व जागांचा कल आला हाती; पाहा निवडणुकीचे सर्व अपडेट एका क्लिकवर
दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार नजीब सुहारवाडी हे राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडील मौलाना अताउल्ला सुहारवाडी हे 1996 च्या विधानसभा निवडणुकीत डोडामधून विजयी झाले होते. वडिलांच्या निधनानंतर नजीब यांनी 1997 मध्ये डोडामधून पोटनिवडणूक जिंकली होती. 2001 ते 2002 पर्यंत ते जम्मू आणि काश्मीरचे गृहमंत्री होते आणि 2009 ते 2015 पर्यंत त्यांनी एमएलसी म्हणूनही काम केले होते. प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.