Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live : धनंजय मुंडे 3000 मतांनी आघाडीवर तर माहिममधून अमित ठाकरे…

बीडमधून धनंजय मुंडे पहिल्या फेरी अखेर 3000 मतांनी आघाडीवर आहेत. पाटण मतदारसंघातील पोस्टल मतमोजणीत शंभूराज देसाई आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 23, 2024 | 09:34 AM
धनंजय मुंडे आणि अमित ठाकरे यांच्या मतदारसंघातील परिस्थिती

धनंजय मुंडे आणि अमित ठाकरे यांच्या मतदारसंघातील परिस्थिती

Follow Us
Close
Follow Us:

 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुका पार पडल्या. आता या निवडणुकीची मतमोजणी केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाचे सरकार येणार याचा अंदाजही एक्झिट पोलने वर्तवला आहे. त्यात महाराष्ट्रातील बहुतांश एक्झिट पोलने महायुतीच्या विजयाचे भाकीत केले आहे. पण आता सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये आता कल यायला सुरुवात झाली आहे.

महायुती आघाडीत भारतीय जनता पक्षाने 149 विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले होते, शिवसेनेने 81 जागांवर आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) 59 जागांवर उमेदवार उभे केले होते. विरोधी MVA आघाडीमध्ये, काँग्रेसने 101 उमेदवार, शिवसेना (उबाठा) 95 आणि राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार) 86 उमेदवार उभे केले. बहुजन समाज पार्टी आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) सारख्या पक्षांनीही निवडणूक लढवली, ज्यामध्ये बसपने 237 उमेदवार उभे केले आणि एआयएमआयएमने 17 उमेदवार उभे केले.

बीडमधून धनंजय मुंडे पहिल्या फेरी अखेर 3000 मतांनी आघाडीवर आहेत. पाटण मतदारसंघातील पोस्टल मतमोजणीत शंभूराज देसाई आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. खामगाव मतदारसंघातून आकाश दादा फुंडकर यांना 1524 मतांची आघाडी पहिल्या फेरीमध्ये मिळाली आहे. याशिवाय, पालघरमध्ये पोस्टल मतदानात महायुतीचे शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित आघाडीवर असल्याचे दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात शांततेत मतमोजणी सुरू आहे.

Maharashtra Election 2024: अपक्ष उमेदवारांमुळे ‘मविआ’चे टेन्शन वाढले; ‘या’ जिल्ह्यात होणार अटीतटीची लढाई

कळवणमध्ये टपाली मतमोजणीत माकपचे जेपी गावीत आघाडीवर

हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर, पोस्टल मतांच्या फेरीतून चेतन तुपे आघाडीवर आहेत.
औसा विधानसभा मतदारसंघ टपाली मतमोजणी सुरुवात झाली आहे. भाजपाचे अभिमन्यू पवार आघाडीवर आहेत. तर अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

अमित ठाकरे चुकवणार अंदाज

माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सध्या आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदाच माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे लढत देत असून निवडणूक जाहीर झाल्यापासूनच सर्वांचे लक्ष अमित ठाकरे यांच्याकडे लागून राहिले आहे. विधानसभेच्या निकालाआधीच विद्यमान आमदार सदा सरवणकर जिंकून येतील असा अंदाज बांधला जात होता. तर एक्झिट पोलनुसार अमित ठाकरे पिछाडीवर राहतील असा अंदाज होता. मात्र सुरूवातीलाच अमित ठाकरे यांनी आपला जम बसवला असल्याचे दिसून येत आहे आणि लवकरच हा निकाल जाहीर होईल. तर पहिल्यांदाच अमित ठाकरे बाजी मारणार की नाही हे पाहावं लागणार आहे

Maharashtra Jharkhand Assembly Elections 2024: महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला! एकही पराभव झाला तर….

माहीमच्या धुरा कोणाच्या हाती?

माहीम मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये 52.67 टक्के मतदान झाले होते आणि आता 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत माहीममध्ये 58 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये माहीममधील मतदानाचा टक्का 5.33 टक्क्यांनी वाढला आहे. तर हा वाढलेला टक्का नक्की कोणाच्या बाजूने झुकणार आणि अमित ठाकरे यांना त्याचा फायदा मिळणार का?

Web Title: Result 2024 maharashtra vidhan sabha chunav parinam assembly election results live winning candidates updates in marathi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 08:54 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly Election Results 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.