Solapur MNS candidate application approved
सोलापूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल हाती येणार आहे. त्यामुळे महायुती सह महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागले आहे. त्याचबरोबर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे पक्ष देखील ताकदीने उभा राहिला आहे. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आक्रमक पवित्रा घेतला असून अनेक उमेदवार जाहीर केले आहेत. आता सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव कोगनुरे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांनी अखेर मंजूर केला.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार मिलिंद मुळे यांनी उमेदवार कोगणूरे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपवल्याचे सांगितले. या अर्थावर दोन्ही बाजूंनी सुनावणी झाली निवडणूक अधिकारी सुमित शिंदे यांनी निकाल पाच वाजेपर्यंत राखून ठेवला होता. त्यांनी मिलिंद मुळे यांची हरकत फेटाळून लावत कोगनुरे यांचा अर्ज वैद्य ठरवला.
वकील कक्कळमेली यांनी या प्रकरणामध्ये अधिक माहिती दिली.
हे देखील वाचा : आचारसंहितेच्या काळात तपास यंत्रणांकडून 187 कोटींची मालमत्ता जप्त !
मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, शहर उत्तरचे उमेदवार प्रशांत इंगळे, शहर मध्यचे उमेदवार नागेश पासकंटी, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे, सचिव रोहित कलशेट्टी हे प्रमुख पदाधिकारी दिवसभर निवडणूक निर्णय कार्यालयासमोर ठाण मांडून होते. उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या अर्जावर हरकत घेतल्याची समजताच पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबईला फोन लावून सूत्र हलवली असल्याचे समजले. दिवसभर मुंबईच्या राजगड कार्यालयात अपडेट देत राहिले.
फडणवीस व राज ठाकरेंमध्ये सूचक राजकीय खेळ
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये चर्चांना उधाण आले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असे राज ठाकरे म्हणाले आहेत. तर 2029 मध्ये मनसेचा मुख्यमंत्री होईल असे राज ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान राज ठाकरेंच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर राज ठाकरे आणि त्यांचा असा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे राज ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच सभेमध्ये राज ठाकरे यांनी यंदा मनसे पक्ष सत्तेमध्ये असेल असे मत व्यक्त केले होते. तसेच पक्षांपेक्षा जास्त जागा मनसे लढवेल असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे जास्त जागांवर देखील मनसेने उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष व राज ठाकरे हे महत्त्वाचे ठरणार आहेत.