A. R. Rahman यांचा धक्कादायक खुलासा! ‘रामायण’साठी 10-12 प्रोजेक्ट्सना दिला नकार; ट्रोलिंगवरही दिलं सडेतोड उत्तर

A. R. Rahman On Ramayan Movie Songs: बहुचर्चित ‘रामायण’ सिनेमाच्या संगीतासाठी ए. आर. रहमान यांनी तब्बल तीन वर्षे मेहनत घेतली. या सिनेमाच्या कामात पूर्णपणे लक्ष देता यावं म्हणून त्यांनी जवळपास १० ते १२ सिनेमांच्या ऑफर्स नाकारल्या. संगीताला अंतिम रूप देण्यासाठी अनेक गाण्यांच्या १२ ते १३ आवृत्त्या तयार करण्यात आल्या.
A. R. Rahman (सौजन्य- सोशलमीडिया)
A. R. Rahman (सौजन्य- सोशलमीडिया)A. R. Rahman (सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  • ‘रामायण’च्या संगीतासाठी ३ वर्षांची मेहनत.

  • ए. आर. रहमान यांनी सोडले १०-१२ सिनेमे.

  • ट्रोलिंगवर रहमान यांचं सडेतोड उत्तर

गेल्या दोन वर्षांपासून नितेश तिवारीच्या रामायण या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत आहे. या चित्रपटामध्ये मोठे कलाकार असल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली असून या सिनेमाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. 'रामायण' या खूप चर्चेत असलेल्या सिनेमाची जगभरात चर्चा आहे. हॉलिवूडला पण टक्कर देणारा असा हा भारतीय सिनेमा निर्माते नमित मल्होत्रा यांनी तयार केला.

सिनेमातल्या भारी व्हीएफएक्सने तर प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. 'रामायण'ची पहिली झलक आली तेव्हापासूनच याच्या संगीताची सुद्धा चर्चा झाली. ए आर रहमान आणि हॉलिवूडचे फेमस संगीतकार हॅन्स झीमर यांनी सिनेमाच्या संगीतावर काम केलं. पण सिनेमाचं पहिलं गाणं आलं आणि ए आर रहमान यांना नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. 'मंगल रंग' गाण्याला तर 'कव्वाली' वाटतेय अशी टीका झाली.

• 3 वर्षं चाललं संगीताचं काम'

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया'मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संगीतकार ए आर रहमान यांनी सिनेमाच्या प्रक्रियेवर बोलले. ते म्हणाले, "गाण्याच्या चालींना फायनल रूप देण्यासाठी आधी आम्ही एक डझनापेक्षाही जास्त व्हर्जन बनवले होते. आम्ही तीन वर्षांपासून 'रामायण'च्या संगीतावर काम करत होतो. याची थीम आणि बाकी सगळ्या गोष्टींवर खूप काम झालं. यातल्या काही गाण्यांचे तर 12-13 व्हर्जन बनले आहेत. 'रावण तांडव'चे पण खरंतर 12-13 व्हर्जन होते. शेवटी आम्हाला असं व्हर्जन मिळालं जे सगळ्यांनाच आवडलं."

• 10-12 सिनेमे सोडले, तरी अभिमान आहेते

पुढे म्हणाले, "या सिनेमाचा प्रवास खूप सुंदर होता. 'रामायण'मुळे मी जवळपास 10-12 सिनेमे सोडले जेणेकरून मी पूर्णपणे या कामात समरस होऊ शकेन. मी बऱ्याच मोठ्या निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी सोडली आणि मला याचा अभिमान आहे. जे प्रोजेक्ट मला मनापासून जोडून ठेवतात तेच मी निवडतो."

A. R. Rahman (सौजन्य- सोशलमीडिया)
Bollywood News: पडद्यापलीकडची कमाई! अभिनयासोबत व्यवसायातही मोठं नाव कमावणारे 'हे' आहेत बॉलिवूड स्टार्स

• ट्रोलिंगवर रहमान यांचं सडेतोड उत्तर

एकीकडे सिनेमातलं 'रावण तांडव' आणि 'मंगल रंग' गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते असतानाच आता मात्र दुसरीकडे यावर टीका पण झाली. रहमान यांनी याआधीच ट्रोलिंगवर उत्तर देताना म्हटलं होतं की, 'सिनेमाच्या कामातच आम्ही इतके बिझी असतो की या चर्चेवर लक्ष द्यायला आमच्याकडे वेळच नसतो. आम्ही इतकं काम करतो, गोष्टींना फिल्टर करतो, नवीन विचार करतो आणि सारखी सुधारणा करत राहतो. त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया बघायला एनर्जीच राहत नाही. आम्ही फक्त आमचं काम समोर ठेवतो. कारण ते काम त्याआधीच बऱ्याच तपासण्यांमधून गेलेलं असतं."

• चित्रपटाची कमाई

रणबीर कपूर अभिनीत 'रामायण' चित्रपटाने प्रदर्शनानंतर १८ दिवसांच्या आत जगभरात सुमारे १,६१६.७० कोटी ते १,६५१ कोटी रुपयांची कमाई केली असून, भारतात ९०० कोटी रुपयांहून अधिक निव्वळ कमाई (नेट कलेक्शन) नोंदवली आहे.