Bollywood News: पडद्यापलीकडची कमाई! ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Bollywood Celebrities Who Built Successful Businesses: आजचा अभिनेता फक्त कॅमेऱ्यासमोर दिसत नाही, तर कॅमेऱ्याच्या मागेही आपली जागा निर्माण करत आहे. चित्रपटांमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा वापर अनेक कलाकार आता स्वत:चे ब्रँड, कंपन्या आणि स्टार्टअप्स उभे करण्यासाठी करत आहेत. फॅशनपासून स्पोर्ट्सपर्यंत आणि ब्युटीपासून तंत्रज्ञानापर्यंत त्यांची गुंतवणूक पाहायला मिळते.
शाहरुख खान यांचे नाव केवळ सुपरस्टार म्हणून घेतले जात नाही, तर यशस्वी व्यावसायिक म्हणूनही त्यांची ओळख आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या माध्यामातून त्यांनी निर्मिती आणि व्हिज्युअल इफेक्ट्सच्या क्षेत्रात मोठी मजल मारली. याशिवाय क्रिकेटमध्ये ग्लोबल नाइट रायडर्सशी त्यांचा संबध आहे. मुलगा आर्यन खानसोबत ते D’YAVOL या लक्झरी ब्रँडशीही जोडले गेले आहेत. शिक्षण आणि मनोरंजन यांचा मेळ घालणाऱ्या KidZaniaमध्येही त्यांची गुंतवणूक आहे.
अभिषेक बच्चन यांनीही आपल्या कमाईचा आणि प्रसिद्धीचा वेगळ्या पद्धतीने वापर केला आहे. जयपूर पिंक पँथर्स आणि चेन्नईयिन एफसी या क्रीडा संघांशी त्यांचा संबंध आहे. याशिवाय युरोपियन T20 लीगमध्येही त्यांनी रस दाखवला आहे. Swiggy, VAHDAM Teas आणि Naagin Sauce यांसारख्या व्यवसायांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. तंत्रज्ञान आणि किरकोळ व्यवसायातील काही नव्या कंपन्यांनाही त्यांनी पाठिंबा दिला आहे.(Bollywood News:)
जॉन अब्राहम हा पडद्यावर फिटनेस आणि अॅक्शनसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता आहे. मात्र व्यवसायाच्या बाबतीतही त्याने आपली वेगळी वाट तयार केली आहे. JA Entertainment या निर्मिती संस्थेसोबतच ते NorthEast United FC शी जोडलेले आहेत. मोटरस्पोर्ट्समध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे. याशिवाय Subko Coffee, NOTO Ice Cream आणि Epigamiaसारख्या नव्या ब्रँड्समध्ये त्यांचा सहभाग आहे.
कपूर कुटुंबाचा अभिनयाचा मोठा वारसा असला तरी रणबीर कपूरने स्वतःची व्यावसायिक बाजू तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ARKS या फॅशन ब्रँडच्या माध्यमातून त्याने या क्षेत्रात प्रवेश केला. फुटबॉलमध्ये Mumbai City FC सोबतही तो जोडला गेला आहे. याशिवाय Prozo, DroneAcharya, Beco आणि Svami यांसारख्या वेगवेगळ्या स्टार्टअप्समध्ये त्याने गुंतवणूक केली आहे.
कतरिना कैफने आपल्या लोकप्रियतेचा योग्य वापर करत ब्युटी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची जागा निर्माण केली. Nykaaसोबत सुरू केलेल्या Kay Beauty या ब्रँडला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. भारतीय बाजारपेठेनंतर या ब्रँडने यूकेमध्येही प्रवेश केला असून Space NKच्या माध्यमातून त्याची आंतरराष्ट्रीय उपस्थिती वाढली आहे.
दीपिका पादुकोणने व्यवसायाच्या बाबतीत एकाच क्षेत्रावर अवलंबून न राहता विविध ठिकाणी पाऊल टाकले आहे. 82°E या स्किनकेअर ब्रँडसोबत तिचे नाव जोडले गेले आहे. KA Productions ही तिची निर्मिती संस्था आहे. याशिवाय Blue Tokai Coffee Roasters, Nua आणि Bellatrix Aerospaceसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तिने गुंतवणूक केली आहे.
आलिया भट्टने कमी वयातच व्यवसायाच्या जगात पाऊल ठेवले. लहान मुलांसाठी Ed-a-Mamma हा ब्रँड सुरू करून तिने चांगली ओळख निर्माण केली. या कंपनीतील ५१ टक्के हिस्सा Relianceने घेतल्याने या व्यवहाराची मोठी चर्चा झाली. याशिवाय Eternal Sunshine Productionsच्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. फॅशन आणि पर्यावरणपूरक व्यवसायांमध्येही तिची गुंतवणूक आहे.
बॉलिवूडमधील या कलाकारांकडे पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. आज प्रसिद्धी ही फक्त चित्रपटांच्या तिकिटांपुरती राहिलेली नाही. कलाकार आपल्या आवडी, अनुभव आणि कमाईचा वापर करून वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये उतरत आहेत. कोणी क्रिकेटमध्ये उतरले, कोणी फॅशनमध्ये तर कोणी तंत्रज्ञान आणि ब्युटीच्या क्षेत्रात आपली जागा निर्माण केली.






