
फोटो सौजन्य - Social Media
सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाची भाची आरती सिंह तिच्या बोल्ड अवतारामुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. पण आता तिच्या नव्या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर भयाण चर्चा सुरु आहे. कारण आरती सिंह सध्या तिच्या नवऱ्यासोबत (दीपक चौहान) थायलंड येथे पिकनिक साजरी करत आहे, दरम्यान थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर तिने बिकिनी घालून काही क्षण टिपले आहेत. तिचा हा बोल्ड अंदाज पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रॉल करण्यास सुरुवात केली आहे. आरती सिंह तिच्या बोल्ड अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. पण यंदा आरतीने या ट्रॉलर्सला प्रत्युत्तर देऊन चांगलाच हिसका दाखवला आहे.
आरतीने या ट्रॉसरला उत्तर म्हणून एक खास पोस्टच शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने बिकिनी परिधान करून नवऱ्यासोबत बोल्ड अंदाजात काही क्षण शेअर केले आहेत आणि त्याखाली भलेमोठे कॅप्शन लिहले आहे. या कॅप्शनमध्ये =” माझं आयुष्य, माझे नियम… माझं शरीर, आणि माझ्या कपड्यांची निवड ही माझीच आहे. आपण अनेकदा “लोक काय म्हणतील?” या विचारात अडकून राहतो. पण आयुष्याच्या एखाद्या वळणावर उभं राहून आपणच स्वतःला विचारतो “मनात होतं तेच का नाही केलं?” तेव्हा जाणवतं की ज्यांच्यासाठी आपण स्वतःला थांबवलं, ते लोक आपल्यासाठी खरंच महत्त्वाचे होते का? काही दिवसांपूर्वी मी बिकिनीमधले फोटो पोस्ट केले होते. काहींनी अनफॉलो केलं, काहींनी टीका केली. त्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम झाला आणि मी ते फोटो काढून टाकले. पण त्यानंतर काही दिवसांतच माझी जिवलग मैत्रीण शेफाली आपल्यात राहिली नाही… आणि तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ‘आयुष्य किती अनिश्चित आहे! मग आपण का नाही जगत आपल्या मनाप्रमाणे?’ मी कोणालाही दुखावत नाहीये. त्यामुळे कुणी अनफॉलो केलं किंवा वाईट कमेंट्स केल्या, तरी त्याचा मला फरक पडू नये. त्यातून त्यांच्या संस्कारांची झलक दिसते… माझ्या कपड्यांची नाही. जे लोक खरोखर माझ्यावर प्रेम करतात, ते मला जशी आहे तशी स्वीकारतील. म्हणून… स्वतःसाठी जगा, आनंदी रहा आणि कुणालाही दुखावू नका.”