Bigg Boss 20 Eviction: ‘बिग बॉस २०’मध्ये १२व्या आठवड्यात मोठा धक्का! माही विज नव्हे, ‘हा’ स्पर्धक घराबाहेर

Bigg Boss 20 Eviction: ‘बिग बॉस २०’च्या १२व्या आठवड्यात धक्कादायक एलिमिनेशनची चर्चा! माही विज नव्हे, लव्ह गिल शोमधून बाहेर पडल्याचा सोशल मीडियावर दावा.
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Published on: 
Updated on: 

Bigg Boss 20 Eviction: ‘बिग बॉस २०’चा ग्रँड फिनाले आता अवघ्या चार आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घरातील स्पर्धा दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. अशातच शोच्या १२व्या आठवड्यात एलिमिनेशनची चर्चा सुरू झाली असून, यावेळी डबल एव्हिक्शन होणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. या आठवड्यात स्काउट ओपी, माही विज, गुल्लू, आम्रपाली दुबे, कनिका मान आणि लव्ह गिल हे सहा स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. दरम्यान, एलिमिनेशनबाबत एक धक्कादायक नाव समोर आले आहे.

माही विज नव्हे, लव्ह गिलचा पत्ता कट?

माही विज गेल्या दोन आठवड्यांपासून कमी मते मिळत असल्याने तिचे एलिमिनेशन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस टक’ आणि ‘द खबरी’ यांसारख्या सोशल मीडिया हँडल्सनी लव्ह गिल शोमधून बाहेर पडल्याची माहिती दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

गेल्या काही दिवसांत लव्ह गिलच्या खेळावरही प्रश्न उपस्थित केले जात होते. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याऐवजी त्याच्या काही कृतींमुळे नाराजी वाढल्याची चर्चा आहे. मात्र, लव्हला थेट घराबाहेर काढण्याऐवजी ‘सिक्रेट रूम’मध्ये ठेवले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्याच्या एलिमिनेशनबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत संभ्रम कायम आहे.

सलमान खानने काझी तौकीरला सुनावले

या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान चांगलाच संतापलेला दिसला. काझी तौकीरच्या ‘लव्ह डे’ या वक्तव्यावर सलमानने नाराजी व्यक्त केली. त्याने काझीला या वक्तव्याबद्दल माफी मागायला हवी होती, असे सुनावले. माही विजनेही त्याला माफी मागण्याचा सल्ला दिला होता, तर अरिशफानेदेखील त्याला असे बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण सलमानने करून दिली.

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Divyanka Bedi Wedding: बॉलिवूडच्या दिग्गज खलनायकाच्या घरी लगीनघाई! रंजीत यांची मुलगी दिव्यांका अडकली विवाहबंधनात

काझीने गेल्या २० वर्षांत केलेल्या संघर्षाचा उल्लेख करत सलमानने त्याला निराश न होण्याचा आणि पुन्हा त्याच चुका न करण्याचा सल्ला दिला. आपल्या कृतींचे परिणाम स्वीकारण्याची तयारी आहे का, असा सवालही त्याने काझीला केला.

स्काउट ओपी आणि गुल्लूलाही सलमानची फटकार

‘वीकेंड का वार’मध्ये सलमानने स्काउट ओपी आणि गुल्लू यांनाही कठोर शब्दांत सुनावले. यावेळी त्याने लव्ह गिलसोबत स्काउट ओपीचे रात्री उशिरा झालेले संभाषण दाखवणारी क्लिपही प्रेक्षकांसमोर आणली. हा व्हिडीओ पाहून लव्ह भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले.

दरम्यान, डबल एलिमिनेशन झाल्यास माही विजलाही घराबाहेर पडावे लागू शकते, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, काझीला त्याच्या चाहत्यांकडून मतदानाचा पाठिंबा मिळत असल्याने माहीला एलिमिनेशनपासून वाचण्याची संधी मिळू शकते, असेही म्हटले जात आहे. कनिका मानच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या आठवड्यात नेमके कोण घराबाहेर जाणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस २०’चा ग्रँड फिनाले २० डिसेंबरला होणार असल्याचीही चर्चा आहे.

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Ramayana GTA Style Game: ‘रामायण’चा आता गेमिंग विश्वातही डंका! GTA स्टाइल गेमसह थीम पार्क आणि म्युझियम उभारणार