
फोटो सौजन्य - Social Media
विविध मराठी मालिका तसेच नाटकांतून मराठी रसिकांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री कविता मेढेकर, तिची मुलाखत सध्या तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने अनेक विषयांवर भाष्य केले आहे पण तिची मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि त्यातील पात्र ‘भुवनेश्वरी’बद्दल तिने सविस्तर चर्चा केली आहे. रंगलेल्या या चर्चेची चर्चा चाहत्यांमध्येही रंगात आली आहे.
कविता मेढेकरचे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील ‘भुवनेश्वरी’ पात्र
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनेला दिलेल्या एका मुलाखतीत कविता मेढेकर सांगते की तिला ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ‘भुवनेश्वरी’ हे पात्र साकारण्याआधी या भूमिकेसाठी कोणत्याही प्रकारचे ऑडिशन किंवा लुक टेस्ट द्यावी लागली नव्हती. मालिकेची निर्माती शर्मिष्ठा राऊत तसेच अद्वैत दादरकर आणि टीमने तिच्यावर दाखवलेला विश्वास तिला या पात्राला साकारण्यासाठी स्फूर्ती देत होते.
या आधी कविताने अनेक मालिकांमध्ये कामे केले आहेत. पण ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ‘भुवनेश्वरी’ हे पात्र थोडे भिन्न होते कारण या पात्रात कविता ‘Villain’ म्हणून समोर येणार होती. कविता सांगते की तिला कोणत्याही प्रकारचे ऑडिशन आणि लुक टेस्ट द्यायची गरज भासली नाही. ती थेट प्रोमो शूटसाठी दाखल झाली आणि तेव्हा ‘भुवनेश्वरी’चा अवतार पाहून तिने मनाशीच स्वतःला सांगितले की हे काही तरी वेगळं आहे, आता तर या पात्रासाठी मेहनत घ्यायचीच!
मालिकेच्या दिग्दर्शकाने कविताला सांगितली एक टेक्निक
मुलाखतीत एक गोष्ट कविता आवर्जून सांगते की त्यावेळी दिग्दर्शकाने तिला शॉटदरम्यान सगळ्यांशी तुच्छ वागण्यासाठी सांगितले जेणेकरून तिला ‘भुवनेश्वरी’ या पात्रात पूर्णपणे येता येईल. ‘भुवनेश्वरी’ हे पात्र कवितासाठी फार अनोखे होते कारण ती म्हणते की जेव्हा त्यांची टीम कोल्हापूरला गेली होती, त्यावेळी तेथील अनेक बायका या डिट्टो ‘भुवनेश्वरी’ची ड्रेसिंग स्टाईल कॉपी करून कविताला भेटण्यास आल्या होत्या.