

‘किल्ला’मध्ये अमृता सुभाष यांच्यासोबत काम करण्याची संधी
त्यांना हवी असलेली व्यक्तिरेखा मीच साकारू शकतो
१ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘झिम्मा ३’
Zimma 3 January 2027 Release : लहानपणापासूनच अभिनयाची आवड, कॅमेऱ्यासमोर उभं राहाण्याची ओढ आणि प्रत्येक नव्या भूमिकेतून काहीतरी वेगळं शिकण्याची उत्सुकता! याच आवडीतून अर्चित देवधरचा अभिनयप्रवास सुरू झाला. ‘किल्ला’सारख्या गाजलेल्या चित्रपटामधून बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अर्चित आता हेमंत ढोमे दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘झिम्मा ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विशेष म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी त्याला पुन्हा एकदा मिळाली आहे. त्यामुळे अर्चितसाठी हा चित्रपट केवळ एक चित्रपट नसून त्याच्या अभिनयप्रवासातील एक खास टप्पा ठरणार आहे.
अर्चितने अगदी लहान वयातच अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. ‘किल्ला’मध्ये अमृता सुभाष यांच्यासोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली. इतक्या कमी वयात एका आशयघन आणि गाजलेल्या चित्रपटाचा भाग होणं, थेट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर पोहोचणं, हा सगळाच अनुभव त्याच्यासाठी मोठी शिकवण देणारा होता.
मात्र, अभिनयाबरोबरच त्याने शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवरही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षणासाठी चार वर्षे यूकेमध्ये राहिलेल्या अर्चितने युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅममधून ‘कलिनरी आर्ट्स अँड मॅनेजमेंट’ या विषयात फर्स्ट क्लाससह पदवी मिळवली आहे. सध्या पुण्यात त्याची एक बेकरी आणि कॅफे आहे.